Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: शुभ कार्यात आंब्याच्या पानांचा का केला जातो वापर? वाचा सविस्तर

प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंबाच्या झाडांच्या पानांचा वापर केला जातो. यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips: हिंदु धर्मात सर्व झाड आणि वनस्पतींना अनन्यसाधारण महत्व आहे. पुजासाठी जितका वापर केला जातो तेवढाच आरोग्यासाठी देखील केला जातो. पुजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर अधिक केला जातो. वास्तुनुसार आंब्याच्या पानांचा वापर करणे शुभ मानले जाते. आंब्याच्या झाडाच्या लाकडाचा वापर हवनासाठी केला जातो. यामुळे घरात सकारात्मकता कायम राहते.

आंब्याच्या झाडाची पूजा का केली जाते?

ज्योतिषाच्या मते आंब्याचे झाड मंगळासाठी कारणीभूत मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगलदोष असेल त्याने आंब्याच्या झाडाची पूजा करावी. तसेच आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात केला जातो. आंब्याच्या पानांशिवाय कोणतेही पूजा पूर्ण होत नाही.

आंब्याच्या पानांचे महत्त्व

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांनी बनवलेले तोरण लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. कलशमध्ये देखील आंब्याचे पाने वापरली जातात आणि पूजाविधीमध्ये फक्त आंब्याच्या पानांनीच पाणी अर्पण केले जाते. तसेच कलश तयार करण्यासाठी नारळाभोवती आंब्याची पाने ठेवणे खूप शुभ मानले जाते. आंब्याच्या पानांचा उपयोग यज्ञवेदी बनवण्यासाठीही केला जातो. मंडप सजवण्यासाठी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. यामुळे सर्व देवी-देवता प्रसन्न होतात.

धार्मिक मान्यतांनुसार, पवनपुत्र हनुमानजींना आंबा खूप आवडतो असे म्हटले जाते. त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पाने पूजेत वापरली जातात. तेथे हनुमानजींची विशेष कृपा राहते आणि नकारात्मकता कमी होतो. माणसाचे जीवन आंब्याच्या पानाशी निगडीत आहे असे म्हणतात. पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्यास व्यक्तीला ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT