Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: पैसे उधार देतांना वास्तुत सांगितलेले 'हे' नियम ठेवावे लक्षात

जेव्हा इतरांना गरज असते तेव्हा आपण त्यांना कर्ज देतो. पण पैसे उधार देताना वास्तुचे काही नियम पाळले नाही तर माता लक्ष्मी नाराज होऊ शकते.

Puja Bonkile

Vastu Tips: अनेक वेळा आपण गरज पडलेल्या लोकांना पैसे उधार देतो.अनेकदा आपण आपल्या जवळच्या किंवा ओळखीच्या लोकांना देखील मदत करण्यासाठी पैसे उधार देतो. कधी ते फक्त मदतीसाठी असते कर कधी कर्जावर व्याज आकारतो. यामुळे आपल्याला फायदा होतो. गरजूंना मदत करणे नक्कीच चांगले असते. पण पैसे उधार देताना काही वास्तु टिप्स फॉलो करणे गरजेचे असते. या वास्तु टिप्स कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

उत्तरेकडे तोंड

तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल तर तिजोरीचे तोंड उत्तरेकडे असावे. याशिवाय कर्ज देताना दक्षिण दिशेकडे तोंड करू नये. जर उत्तर दिशेला पैसा असेल तर तुम्हाला वेळेवर पैसे परत मिळतात आणि तुम्हाला पूर्ण रक्कम मिळते. तसेच तुम्हाला पैसे परत मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. काही कारणास्तव उत्तरेकडे तोंड करणे शक्य नसल्यास, तुम्ही पूर्वेकडे देखील तोंड करू शकता.

बचतीचे पैसे उधार देऊ नका

जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे उधार देता तेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन खर्चासाठी काढलेल्या पैशांमधुन कोणालाही उधार देऊ नका. कारण असे केल्यास तुमच्यावर आर्थिक ताण वाढू शकतो. वास्तुनुसार देखील असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे नेहमी काही पैसे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मगच इतरांना मदत करा.

असे पैसे देऊ नका

अनेकवेळा आपण पैसे पुजेत ठेवतो आणि नंतर ते वेगळ्या पिगी बँकेत जमा करतो. नंतर, हळूहळू पैसे जमा होत जातात. जो आपण अनेक प्रकारे खर्च करतो. इतकेच नाही तर अनेक वेळा आपण ते पैसे इतरांना उधारही देतो. पण वास्तुनुसार असे करणे अशुभ मानले जाते. असे केल्यास समोरच्या व्यक्तीच्या जीवनात समस्या निर्माण होतात. तसेच तुम्हालाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

उजवा हात वापरा

दुसऱ्या व्यक्तीला पैसे देतांना नेहमी उजवा हात वापरावा. चुकीच्या हाताने पैसे दिल्यास तुम्हाला आर्थिक हानी होऊ शकते.तसेच जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून जेव्हा पैसे परत घेता तेव्हा दोन्ही हाताने घ्यावे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT