Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात तुळशीच्या मंजुळा ठेवल्यास मिळेल आर्थिक लाभ

Vastu Tips: तुम्हीही घरात तुळशीच्या मंजुळा ठेवत असाल तर आर्थिक लाभ मिळेल.

Puja Bonkile

Vastu Tips For Home: हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला खुप महत्व आहे. तसेच या रोपात अनेक औषधीयुक्त गुणधर्म देखील आहेत.

वास्तुमध्ये तुळशीचे रोप घरात लावणे शुभ मानले जाते. तसेच तुळशीच्या मंजुळा देखील शुभ मानल्या जातात. पण तुळशीच्या मंजुळा कुठे ठेवणे शुभ मानले जाते हे जाणून घेऊया.

हिंदू धर्मातील सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक म्हणून या रोपातीची पूजा केली जाते. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते आणि घरात अन्न आणि धनाचा कमतरता जाणवत नाही.

ज्याप्रमाणे तुळशीच्या झाडाची पाने महत्त्वाची मानली जातात, त्याचप्रमाणे तुळशीच्या मंजुळांनाही विशेष महत्त्व असते आणि तुळशीच्या मंजुळा घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास तुमच्या घरात सुख-समृद्धी नेहमीच राहते.

पैशाचीही कमतरता जाणवत नाही. चला तर मग जाणून घेऊया घरातील कोणत्या खास ठिकाणी तुळशीच्या मंजिरी ठेवणे तुमच्यासाठी शुभ असू शकते. 

वास्तूशास्त्रामध्ये विविध वनस्पती विशिष्ट ग्रहांशी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांशी जोडल्या जातात. तुळशीची वनस्पती विशेषतः गुरु ग्रहाशी संबंधित आहे.

गुरु हा ग्रह सुख-समृद्धीचे प्रतिक मानला जात असल्याने ही वनस्पती घरात ठेवल्यास तुमच्या घराची आर्थिक स्थिती नेहमी मजबूत राहते आणि कधीही धनाची हानी होत नाही. तुळशी मंजुळा घरात ठेवल्याने बृहस्पति ग्रहाच्या सकारात्मक ऊर्जेचा ताळमेळ राखला जातो, ज्यामुळे घरात आर्थिक समृद्धी येते.

  • बाल्कनी

जर तुमच्या घराची बाल्कनी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल तर तुळशीच्या मंजुळा सुरक्षित ठिकाणी ठेवल्याने तुमच्या घरात आर्थिक समस्या येणार नाही.

हे केवळ वास्तु तत्त्वांनुसारच नाही तर तुमच्या घरासाठी संपत्तीचे मार्ग उघडण्यास मदत करते.  

  • पर्स

जर तुम्ही शुक्रवारी तुळशीची काही पाने तोडून पिवळ्या कागदात किंवा कपड्यात गुंडाळून तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवली तर तुमच्या घरात नेहमी पैशांचा ओघ राहील.

तुळशीच्या मंजुळांमधुन निघणारी ऊर्जा पैसा आकर्षित करण्यास मदत करते.

  • योग्य दिशा

वास्तूनुसार घराची उत्तर-पूर्व दिशा किंवा ईशान कोन धन आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी सर्वात शुभ मानले जाते. हा कोपरा धनाचे देव कुबेर यांच्याशी संबंधित आहे आणि ती दिशा आहे जिथून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते.

असे मानले जाते की घराच्या या दिशेला स्वच्छ भांड्यात तुळशीचे रोप ठेवल्यास तुमच्या घरात कधीच आर्थिक समस्या येणार नाही.

  • मंदिर

घरातील मंदिर हे सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे. तुळशीच्या मंजुळा ठेवल्यास घरात सदैव समृद्धी राहील. हे स्थान पूर्णपणे सकारात्मक उर्जेने परिपूर्ण मानले जाते.

या ठिकाणी लाल कपड्यात तुळशीची काही पाने बांधून ठेवल्यास तुमच्या मनात नेहमी चांगल्या भावना येतात. तुळशीच्या मंजुळा संपूर्ण घरात उर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यास मदत करते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT