Valentine's Day Gift vastu tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentine Day 2024: जोडीदाराकडून मिळालेले गिफ्ट 'या' दिशेने ठेवल्यास नातं होईल घट्ट

व्हॅलेंटाईन डे जवळ आला की प्रेमाचे ढग दाटून येतात. या दिवशी जोडीदार एकमेकांना त्यांच्या भावना सांगतात.

Puja Bonkile

vastu tips valentine day 2024 gift direction vastu tips

फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमाचा सुगंध सर्वत्र पसरू लागतो. फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. प्रत्येकजण प्रेमाच्या बाबतीत उत्साही राहतो. प्रेमी युगल आणि जोडप्यांसाठी 'व्हॅलेंटाइन डे' खूप खास मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा प्रेमाचा कारक मानला जातो.

एखाद्या व्यक्तीची ग्रहस्थिती अनुकूल असेल तरच त्या व्यक्तीच्या प्रेम जीवनात आनंद राहतो. आता अशावेळी जर तुमच्या जोडीदाराने व्हॅलेंटाईन वीकमध्ये एखादी भेटवस्तू दिली तर ती देखील योग्य दिशेने ठेवावी असे सांगण्यात आले आहे. यामुळे नातं अधिक घट्ट होतं.

नैऋत्य दिशा

जर तुम्हाला तुमचं नातं मजबूत ठेवायचे असेल तर तुमच्या 'व्हॅलेंटाइन डे' ला जोडीदाराकडून मिळालेले गिफ्ट नैऋत्य दिशेला ठेवा. यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आणि तुमचे दोघांमध्ये अधिक प्रेम वाढेल. 


ईशान्य दिशेला भेटवस्तू ठेवा

तुमची लव्ह लाईफ चांगली राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर ते ईशान्य दिशेला ठेवा. हे तुमच्यासाठी खूप चांगले असेल आणि प्रेम प्रकरणांमध्ये तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्या कमी होतील. 

भेटवस्तू पश्चिम दिशेला ठेवा

पश्चिम दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते . त्यामुळे जोडीदाराकडून काही भेटवस्तू मिळाल्यास ते घराच्या पश्चिम दिशेला ठेवा. यामुळे तुमच्या नात्यात गोडवा राहील आणि तुमच्या प्रेम जीवनातील समस्याही दूर होतील. 

जोडीदाराला गिफ्ट द्यावे

जर तुमचा जोडीदार तुम्हाला परफ्यूम भेट देत असेल तर ते फक्त पश्चिम दिशेला ठेवा. कारण अत्तर हा शुक्राचा कारक आहे. त्यामुळे हे दान या दिशेला ठेवल्यास लव्ह बर्ड्सच्या आयुष्यात कधीही कोणतीही अडचण येणार नाही आणि माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांचा आशीर्वाद कायम राहील. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Captain: वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला कर्णधार! क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

Goa My Home Scheme: गोमंतकीयांना दिवाळीची भेट! 'माझे घर', मुंडकार हक्कांसह जमीन प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढणार

Mohammed Shami Test Cricket Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'माझं एकच स्वप्न होतं...'

Goa Politics: निवडणुकीला 3 महिने बाकी, भाजपचा मोठा निर्णय; संकल्प आमोणकर घेणार मंत्रिपदाची शपथ

Horoscope: शनिवारचे राशिभविष्य! मेष, मिथुनसह 4 राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; नोकरीपासून व्यवसायापर्यंत होणार मोठा आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT