Vastu Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: तुम्ही भाड्याच्या घरात राहणार असाल तर 'या' टिप्स ठेवा लक्षात

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही भाड्याच्या घरात राहणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

अनेक लोकांना व्यवसाय, नोकरी किंवा इतर कारणांमुळे भाड्याच्या घरात राहावे लागते. अनेकदा घरमालक भाड्याने दिलेली घरे बांधताना वास्तूची काळजी घेत नाहीत. यामुळे वास्तू दोष त्या घरात भाड्याने राहणाऱ्या लोकांसाठी त्रासदायक ठरतो. भाडेकरूंना भाड्याच्या घरात नागरी काम करता येत नाही, परंतु त्यांनी काही बदल केल्यास ते वास्तू दोष दूर करू शकतात. जाणुन घेउया काही वास्तु टिप्सबद्दल(Vastu Tips) ज्याचा अवलंब करून भाड्याच्या घरात राहून वास्तू दोषांपासून मुक्ती मिळू शकते.

* भाड्याच्या घरात वास्तुदोष दूर करण्याचे उपाय

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही भाड्याच्या घरात राहणार असाल तर घराचा ईशान्य जागा रिकामी राहील हे लक्षात ठेवा. याशिवाय घराच्या दक्षिण-पश्चिम भागात सोफा किंवा बेड सारख्या जड वस्तू ठेवता येतात.

* घरामध्ये पलंग ठेवताना नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या पलंगाचा पुढचा भाग दक्षिण दिशेलाच असावा. झोपताना तुमचे पाय नेहमी उत्तर दिशेला आणि तुमचे डोके पूर्व दिशेला असावे.

* भाड्याच्या घरात पूजेची खोली असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या भाड्याच्या घरात पूजा घर (Home) बांधत असाल तर ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. असे केल्याने तुम्हाला धन-संपत्तीमध्ये समृद्धी मिळेल.

* वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाण्याचा अपव्यय करणे अशुभ मानले जाते. सर्वप्रथम तुमच्या घरातील पाण्याचा कोणताही नवीन पाइप गळत नाही ना याची खात्री करा.

* घरात प्रवेश करताना पहिली भिंत जी दिसते ती कधीही रिकामी ठेवू नका. त्या भिंतीत तुम्ही गणपतीची (Ganesh) सुंदर मूर्ती ठेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Teacher Transfer Protest: बदली रद्द करा! शिक्षिकेच्या तडकाफडकी बदलीविरोधात गावडोंगरी शाळेतील विद्यार्थी पटांगणात ठाण मांडून; पालक आक्रमक

Goa Casino Crackdown: कोट्यवधींचा महसूल थकवणाऱ्या दोन बड्या कॅसिनोंना सरकारचा दणका! परवाने केले तत्काळ रद्द; वारंवार नोटीस देऊनही मालकांचं उत्तर नाही

Romeo Lane Illegal Shack: हडफडे घटनेनंतर सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये! दोन कॅसिनोंचे परवाने रद्द, तर रोमिओ लेनच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

Horoscope: तुमच्या इच्छा पूर्ण होतील! 'या' राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या संपूर्ण भविष्य!

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

SCROLL FOR NEXT