Vastu Tips For Shiva Idol: वास्तुशास्त्रानुसार देवी-देवतांची चित्रे किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. ज्या घरात देवी-देवतांचे चित्र किंवा मूर्ती असते, त्या घरात सदैव सुख-समृद्धी असते. हिंदू धर्मात शिवाला सर्व देवतांमध्ये सर्वोच्च स्थान आहे.
असे म्हणतात की भगवान शिवशंकरांच्या कृपेने मोठे संकटही टळते. ज्या घरात महादेवाची कृपा असते, तिथून संकटे दूर राहतात. त्यामुळे लोक आपल्या घरात शिवाचे चित्र किंवा मूर्ती नक्कीच ठेवतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये शिवाचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला जाणून घेऊया घरात भगवान शंकराचे चित्र लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
या दिशेला भगवान शंकराचे चित्र लावा
भगवान शंकराचे निवासस्थान म्हणजेच कैलास पर्वत उत्तर दिशेला आहे. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवा. वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात भगवान शंकर क्रोधित मुद्रेत असतील त्या घरात कधीही अशी मूर्ती स्थापित करू नये. कारण भगवान शंकराची ही मुद्रा विनाशाचे प्रतीक मानली जाते.
असे चित्र शुभ मानले जाते
भगवान शंकराचे असे चित्र घरात लावावे, ज्यामध्ये ते आनंदी व हसतमुख दिसत आहेत. असे चित्र लावल्याने घरात सदैव सुख-समृद्धी राहते.
घरात शिव परिवाराचे चित्र लावावे
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये शिव परिवाराचे चित्र लावणे खूप शुभ असते. असे केल्याने घरात कलह राहत नाही. त्याचबरोबर मुलेही आज्ञाधारक बनतात.
या ठिकाणी शंकराची मूर्ती ठेवावी
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये अशा ठिकाणी भगवान शंकराची मूर्ती स्थापित केली पाहिजे जिथून प्रत्येकजण सहजपणे पाहू शकेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.