Vastu Tips For Rented Home Dainiik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Rented Home: घर भाड्याने घेत आहात? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

घर भाड्याने घेत असाल तर तुम्ही वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले पाहिजे. अन्यथा वास्तुदोष आणि नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.

Puja Bonkile

Vastu Tips For Rented Home: वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम पाळल्यास वास्तुदोष आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. अनेक लोक स्वत:चे घर घेऊ न शकल्याने भाड्याने राहतात. भाड्याच्या घरात वास्तुदोष असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हाला जर वास्तुदोष दूर करायचा असेल तर वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

भाड्याच्या घरात स्वतःहून बरेच बदल करता येत नाहीत. तुम्हीही भाड्याच्या घरात राहात असाल तर घरातील काही वस्तूंची जागा बदलून वास्तू दोष दूर करू शकता. भाड्याने घर घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  • वस्तुंची योग्य दिशा

भाड्याच्या घरात वस्तूंमध्ये बदल करताना लक्षात ठेवा की घराचा बहुतेक उत्तर-पूर्व भाग रिकामा ठेवावा. बेड, कपाट यासारख्या जड वस्तू घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य भागात ठेवाव्यात.यामुळे वास्तुदोष दूर राहतो.

  • झोपण्याची योग्य दिशा

भाड्याच्या घरात झोपण्याची योग्य दिशा निवडावी. डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असावेत. जर हे शक्य नसेल तर तुम्ही पश्चिमेकडे डोके ठेवून झोपू शकता. परंतु उत्तरेकडे डोके ठेवून झोपू नये.

  • देवघर

भाड्याच्या घरात देवघर उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला असावे. या दिशेला स्नानगृह ठेवल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. म्हणून, भाड्याच्या घरात प्रत्येक गोष्टीच्या योग्य दिशा पाहून वस्तु ठेवाव्या.

  • योग्य घर

भाड्याने घर घेण्यापूर्वी कोणत्या जोगेवर आहे हे जाणून घ्यावे. स्मशानभूमी, रुग्णालय, किंवा गर्दीच्या ठिकाणी घर भाड्याने देणे टाळावे. तसेच जवळपास मोबाईल टॉवर किंवा विजेचे खांब असलेल्या ठिकाणी राहणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की या गोष्टी जीवनात अडथळे आणतात.

  • भाड्याच्या घरात हवा खेळती असावी

वास्तूमध्ये योग्य नैसर्गिक प्रकाशाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्या घराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल आणि घरात चांगली हवा खेळती राहिल याची खात्री करावी. सकाळचा सूर्यप्रकाश सकारात्मकता आणतो तर दुपारची इन्फ्रारेड किरणे आरोग्यासाठी हानिकारक असतात, त्यामुळे कोणतीही खिडकी दक्षिणेकडे किंवा पश्चिमेला असेल तर ती वास्तुदोषात येते. असे घर भाड्याने घेणे टाळावे.

  • किचनची योग्य दिशा

तुमची किचन ईशान्य दिशेला नसावी. किचनसाठी आग्नेय-पूर्व दिशा ही उत्तम जागा आहे.यामुळे घर भाड्याने घेतांना वरिल सर्व गोष्टींची काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT