Vastu Tips Mental Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: वास्तुचे 'हे' उपाय केल्यास मिळेल मानसिक शांती, वाचा एका क्लिकवर

घरामध्ये ठेवलेल्या वस्तुंचा घरातील सदस्यांवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips Mental Health: वास्तुशास्त्रात दिशांना खुप महत्त्व आहे. या दिशांना ठेवलेल्या गोष्टींचा आपल्या जीवनावर नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम होतो. काहीवेळा या नकारात्मक शक्तींचा आपल्यावर मानसिक परिणाम होतो. 

त्यामुळे घरातील सदस्यांची चिडचिड होउन मानसिक ताण वाढतो. तसेच कामात रस राहत नाही आणि त्यामुळे कधी कधी तब्येतही बिघडू लागते. वास्तूचे काही उपाय मानसिक तणाव कमी करतात. चला जाणून घेऊया या वास्तु टिप्स कोणत्या आहेत.  

  • घराच्या (Home) प्रमुखाने नेहमी नैऋत्य दिशेला असलेल्या खोलीत झोपावे. असे न केल्याने घरातील सदस्यांमध्ये मानसिक ताण वाढतो. झोपताना पाय पश्चिम दिशेला आणि डोके उत्तर दिशेला नसावेत. त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. झोपताना डोके आग्नेय दिशेला असावे.

  • घरातील कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेकदा ताण निर्माण हेउ शकतो. त्यामुळे घरातील सर्व तुटलेल्या वस्तू लवकरात लवकर घराबाहेर फेकून द्यावे. स्वयंपाकघरातील तुटलेली भांडी घराबाहेर काढा. तुटलेल्या वस्तु घरात असल्यास नकारात्मक शक्ती वास करते.

  • घरामध्ये असलेला मुख्य आरसा कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला नसावा. त्यामुळे मानसिक ताण वाढतो. घरात दोन आरसे कधीही समोरासमोर ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते. घरात तुटलेल्या काचेच्या वस्तु असेल तर त्या लगेच काढून टाकाव्या. तुटलेल्या काचांमुळे मानसिक ताण वाढतो.

  • अविवाहित लोकांची खोली कधीही दक्षिण-पश्चिम दिशेला नसावी. त्यामुळे त्यांच्या स्वभावात उग्रपणा आणि चिडचिड वाढते.

  • घराच्या भिंती कधीही गडद रंगाने रंगवू नयेत. घराच्या भिंती नेहमी लाइट रंगांनी रंगवाव्यात. अन्यथा नकारात्मक ऊर्जा मन आणि मेंदूवर वर्चस्व गाजवू लागते.

  • ज्या घरात देव उग्र किंवा रागावलेला दिसतो त्या घरात देवाचे असे चित्र किंवा मूर्ती ठेवू नये. घरात कोणतेही हिंसक चित्र असू नये. त्यामुळे घरातील सदस्यांचा मानसिक ताणही वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Pak: "खेळात राजकारण येता नये" आशिया कप ट्रॉफीच्या वादावर एबी डिव्हिलियर्सचं स्पष्टीकरण, पाकड्यांची बाजू घेत म्हणाला...

Goa News Live Updates: वाळपईत मोटार सायकल पायलटांना मोफत हेल्मेट वितरण

RSS: संघर्ष, सेवा आणि समरसता; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली शतकाची गाथा

प्रवाशांसाठी मोठी बातमी! KTCLचा चेहरामोहरा बदलणार; 2026 पर्यंत 'कदंब' होणार पूर्णपणे डिजिटल

Opinion: मराठी भाषा म्हणजे 'अनेक पैलूंची' नात्याची गुंफण! भारतीय भाषांशी जुळलेल्या बंधांचे रहस्य

SCROLL FOR NEXT