Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: लग्न जुळत नाही? मग वास्तुशास्त्रात सांगितलेले 'हे' उपाय करुन पाहाच

जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे लग्न जुळत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रातील काही उपाय करुन पाहु शकता.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips: वास्तुशास्त्रामध्ये अनेक समस्यावर उपाय सांगितलेले आहेत. तसेच जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे लग्न जुळत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रातील काही उपाय करुन पाहु शकता.

अनेकदा 'चट मंगनी पट ब्याह' देखील होतो. पण कधी खधी लग्नगाठ बांधायची म्हणजे कठीण होउन जाते. पण काळजी करु नका वास्तुशास्त्रात यासाठीही काही उपाय सांगितलेले आहे.

वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची (Sleep) पद्धत सर्वात महत्वाची मानली जाते. म्हणजे तुम्ही झोपतांना कोणत्या दिशेला तोंड करता. ज्यांचे विवाह होत नाहीत अशा व्यक्तींनी आपलं डोकं झोपताना उत्तर पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. दक्षिण पश्चिम दिशेला डोकं करून झोपणे अशुभ मानले जाते.

  • घराच्या भिंतींचा रंग

घरातल्या पडद्यासोबतच घरातील भिंतीचा रंगही लाइट असावा. लाइट रंगाच्या भिंतीही तुमच्या विवाहाला सकारात्मक वातावरण निर्माण करतात.

  • बेडशीट्स

लग्न जुळण्यासाठी तुमच्या बेडशीटसच्या रंगांचीही काळजी घ्यायला हवी. ज्यांचे लग्न होत नाहीये अशा व्यक्तींनी गुलाबी किंवा पिवळ्या रंगांच्या बेडशीट्स वापरल्या पाहिजे. असे केल्याने त्याचा फायदा होतो आणि घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

  • घरात असणाऱ्या पायऱ्या

काही लोकांच्या घरांमध्ये मधोमध पायऱ्या केलेल्या असतात. वास्तुनुसार ज्या लोकांच्या घराच्या मधोमध पायऱ्या असतात त्या व्यक्तींना लग्नाचे योग लवकर येत नाहीत. घराच्या मधोमध असणाऱ्या पायऱ्या नकारात्मक उर्जा निर्माण करतात.

  • लोखंड

ज्या लोकांचे लग्न होत नाही अशा व्यक्तींनी पलंगाखाली लोखंडी वस्तू ठेवावी. पण घरात स्वच्छताही ठेवावी. असं केल्याने सकारात्मक उर्जा मिळतेच मात्र त्याचबरोबर देवही प्रसन्न होतात.

कोणती काळजी घ्यावी

  •  वास्तुशास्त्रानुसार (Vastu- Shatra) बेडरुममध्ये गडद आणि लाल रंगाची फुले कधीही लावू नका कारण ती शुभ मानली जात नाहीत.

  • पलंगावर पांढर्‍या रंगाची चादर किंवा पडदे लावणे शुभ मानले जाते.

  • बेडरूममध्ये टीव्ही, टेलिफोन किंवा कॉम्प्युटर ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

  • तसेच पुस्तके ठेवू नका कारण यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येईल आणि झोप येणार नाही.

  • अविवाहित तरुण किंवा मुलीने कधीही दारासमोर डोके किंवा पाय ठेवू नये.

  • आग्नेय कोनात क्रिस्टलचे झाड ठेवल्यास चांगले होईल.

  • आग्नेय कोन असलेल्या खोलीत लव्ह बर्डचा फोटो ठेवावा.

  • बेडरूममध्ये फिकट गुलाबी पडदे वापरता येतील.

वास्तुशास्त्रामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी सांगितलेले उपाय

  • घराच्या भिंतीवर स्वस्तिकचे चिन्ह लावावे, असे केल्याने घरात देवता वास करतात असे मानले जाते.

  • घरामध्ये आक्रमक प्राणी आणि पक्ष्यांची चित्रे लावू नये.

  • घराच्या पूर्व दिशेला सूर्योदयाचे चित्र लावावे यामुळे मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

  • घरामध्ये तुळशीचे रोप अवश्य लावावे. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो.

  • रोज संध्याकाळी घरामध्ये देवाजवळ कापूर जाळल्याने संपत्तीमध्ये वाढ होते.

  • आपल्या घरामध्ये वर्षातून दोनदा हवन केल्याने वास्तु देवता प्रसन्न होतात.

  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आलेल्या गाय आणि वासराला पोळी आणि गूळ खायला द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT