Vastu Tips For Job Career Dainik Gomantk
लाइफस्टाइल

Vastu Tips For Job Career: नोकरीत मिळेल मनासारखे यश! फॉलो करा 'या'सोप्या गोष्टी

जर तुम्हाला तुमच्या नोकरीत वर्षानुवर्षे प्रमोशन मिळत नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन नवग्रह अभिषेक करावा.

Kavya Powar

Vastu Tips For Job Career: जर कुंडलीत दहाव्या घराचा स्वामी शुभ नसेल आणि त्याच घरात कोणताही अशुभ ग्रह असेल तर त्या व्यक्तीला इच्छित काम मिळत नाही. याशिवाय बुध आणि शनि ग्रहांची स्थिती बिघडली तरी व्यक्तीला नोकरीत उच्च स्थान मिळत नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत; ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन मिळू शकते.

  • जर तुम्हाला तुमच्या नोकरीत वर्षानुवर्षे प्रमोशन मिळत नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन नवग्रह अभिषेक करावा. यामुळे राहू आणि केतूचा प्रभाव तर दूर होईलच पण नकारात्मक ऊर्जेपासूनही तुमची मुक्तता होईल.

  • रोज सूर्योदय होण्यापूर्वी उठून लवकर स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार करावा. यानंतर अक्षत म्हणजेच तांदूळ घेऊन पाण्याने अभिषेक करून हे अक्षत शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे तुम्हाला संपत्ती वाढीचा आणि प्रगतीचा आनंद मिळेल.

  • ऑफिसमध्ये दक्षिण-पश्चिम दिशेला बसण्याचा प्रयत्न करा. याशिवाय शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीसमोर लवंग आणि सुपारी ठेवा आणि ऑफिसला जाताना ही लवंग आणि सुपारी सोबत ठेवा.

  • रविवारी किंवा मंगळवारी एक नारळ घेऊन तो लाल कपड्याने बांधावे. यानंतर पूर्वेकडे तोंड करून वाहत्या पाण्यात टाका. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल.

  • सात प्रकारचे धान्य घेऊन मंदिराच्या छतावर पक्ष्यांसाठी 41 दिवस टाका. याशिवाय त्यांच्यासाठी पाण्याचीही व्यवस्था करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात प्रगती दिसेल.

  • परदेशात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या लोकांनी त्यांच्या हॉलमध्ये उडत्या हनुमानजींचा फोटो लावावा जेणेकरून ते शक्य तितके त्यांच्यासमोर दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT