Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips for Happy Home: घरात होताहेत सतत भांडण अन् वाद? वास्तूशास्त्राच्या या उपायांनी घरातील नकारात्मक ऊर्जा करा दूर

तुमच्या घरातही भांडणे होत आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर याचे एक कारण वास्तुदोष असू शकते.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips For Happy Home: आपल्या कुटुंबात सुख, शांती आणि आनंद नांदावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक खूप मेहनत घेतात. अनेकांना मेहनत करूनही यश मिळत नाही. या ना त्या कारणाने घरात भांडण किंवा वाद होतच असतात.

तुमच्या घरातही भांडणे होत आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर याचे एक कारण वास्तुदोष असू शकते.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाहू लागली तर घरातील सदस्यांमध्ये कलह, आर्थिक समस्या इत्यादी वाढू लागतात. मात्र, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तूशास्त्रामध्ये अनेक प्रभावी उपायही सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने तुम्ही नकारात्मक ऊर्जा तर दूर करू शकताच पण समस्यांपासूनही सुटका मिळवू शकता. चला जाणून घेऊया त्या उपायांबद्दल...

मातीची भांडी आग्नेय दिशेला ठेवावीत

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे, तर घराच्या आग्नेय दिशेला मातीच्या भांड्यात पाणी भरा. या उपायाने तुम्हाला काही दिवसातच घरातून नकारात्मक ऊर्जा निघून गेल्याचे दिसून येईल.

मीठाच्या पाण्याने लादी पुसावी

घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी, पुसताना पाण्यात मीठ किंवा तुरटीचे काही भाग टाका. मीठ आणि तुरटीमुळे नकारात्मक ऊर्जा लवकर नष्ट होते, अशी वास्तूमध्ये श्रद्धा आहे.

पंचमुखी हनुमानाचे चित्र लावा

जर तुमच्या घराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर येथे पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा कधीही राहत नाही.

या ठिकाणी कापूर ठेवावा

याशिवाय ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तेथे थोडा कापूर ठेवावा. काही दिवसांनी तो कापूर संपल्यावर पुन्हा तिथे कापूर टाकावा. यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील आणि घरातील धन आणि धान्यात वाढ होईल.

तुळशीचे रोप लावावे

तुळशीचे रोप फार शुभ मानले जाते. वास्तू तज्ज्ञांच्या मते, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT