Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: जेवण करतांना वास्तुच्या 'या' नियमांचे करावे पालण, घरात लाभेल सुख-शांती

वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips For Eating Food: हिंदु धर्मात वास्तुशास्त्राला खुप मानले जाते. वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते. दुसरीकडे निष्काळजीपणामुळे वास्तू दोष आढळतात. 

वास्तुदोषांमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागु शकते. यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होउ शकतो. यासाठी घरामध्ये वास्तु नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वास्तु तज्ज्ञांच्या मते, जेवण करतांना वास्तु नियमांचे पालन केले पाहिजे. 

यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. यासोबतच माता अन्नपूर्णाही प्रसन्न होते. त्यांच्या कृपेने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. चला, जाणून घेऊया हे नियम कोणते आहेत.

  • वास्तू तज्ञांच्या मते जेवण करतांना तुटलेल्या किंवा घाणेरड्या भांड्यांचा वापर करु नये. अशा भाड्यांचा वापर केल्याने घरात अशुभता वाढते. तसेच घरामध्ये वाद निर्माण होउ शकतात. .

  • वास्तूनुसार जेवण करतांना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. दक्षिण दिशेला तोंड करून कधीच जेवण करु नये. दक्षिण दिशा पितरांची आहे. या दिशेला तोंड करून जेवण केल्यास पोटाचे विकार होउ शकतात.

  • जेवण देताना ताट एका हाताने धरू नये, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. जेवणाचे ताट नेहमी दोन्ही हातांनी धरावे. यामुळे कुटुंबात प्रेम आणि आपुलकी वाढते.

  • जेवताना अन्नाचे ताट कधीही जमिनीवर ठेवू नका. थेट जमिनीवर बसून अन्न घेऊ नका. यासाठी चटईवर बसावे. यासोबतच ताट पाटावर ठेवूनच जेवण करावे.

  • वास्तु तज्ज्ञांच्या मते, बेडवर बसून कोणतेही पदार्थ खाउ नये. वास्तुशास्त्रात असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या मनात नकारात्मकता वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bashudev Bhandari: अंधारात गाडी गेली नदीत, युवती बचावली पण 'तो' बेपत्ता; 'बाशुदेव' प्रकरणात 279 पानांचे आरोपपत्र दाखल

Canacona Fire News: काणकोणात आगीचे थैमान! दागिने वितळले, गाद्या जळाल्या; 2 मुलींसह महिला बचावली

Rashi Bhavishya 17 September 2025: नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळेल, कामाच्या ठिकाणी कौतुक होईल;प्रवासात यश

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

SCROLL FOR NEXT