Vastu Tips For Dustbin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Dustbin: घराच्या 'या' दिशेला डस्टबिन ठेवल्यास जाणवेल आर्थिक चणचण

वास्तुशास्त्रात डस्टबिन कोणत्या दिशेला असावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips For Dustbin: वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. ज्याचा परिमाण घरातील सदस्यांवर होतो. अनेकवेळा घरातील वास्तुदोषाचा परिणाम हा व्यक्तींच्या जीवनावर होतो. सर्वांच्या घरात डस्टबिन असते. पण वास्तुनुसार डस्टबिन कोणत्या दिशेला असावी हे जाणून घेऊया.

पण घरातमध्ये असलेल्या डस्टबिनची दिशा चुकीची असेल तर वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागू शकते. घरातील सदस्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

  • घरात कोणत्या दिशेला ठेवू नये डस्टबिन

वास्तुशास्त्रानुसार घरातली डस्टबिन कधीही ईशान्य दिशेला ठेऊ नये. घरातली डस्टबिन ईशान्य दिशेला असल्यास त्याचा घरातल्या सदस्यांना गंभीर मानसिक त्रास होऊ शकतो. कुटुंब प्रमुखाला तणावातूनही जावे लागू शकते.

घरातली डस्टबिन आग्नेय दिशेला असेल तर घरातल्या सदस्यांवर आर्थिक बोजा वाढू लागतो.

घरच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला डस्टबिन असल्यास घरातल्या लोकांना निराशा ग्रासते. सदस्यांच्या विकासात अडथळा येतो. नोकरी आणि करिअरच्या चांगल्या संधीही कमी होऊ शकतात असे वास्तुशास्त्र सांगते.

  • कोणत्या दिशेला डस्टबिन असावी

वास्तुशास्त्रात घरामध्ये डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे हे सांगितले आहे. डस्टबिन नेहमी घराच्या नैऋत्य दिशेला किंवा वायव्य दिशेला ठेवावी. तेसच डस्टबिन उत्तर-पश्चिम दिशेलाही ठेवणे शुभ मानले जाते.

  • घराबाहेर ठेवू नका डस्टबिन

वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे डस्टबिन कधीही घराबाहेर ठेऊ नका. त्यापेक्षा ती नेहमी घरात ठेवावी. याशिवाय वास्तुशास्त्रात डस्टबिनसाठी नैऋत्य किंवा उत्तर-पश्चिम दिशा शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन उत्तर-पश्चिम दिशेला ठेवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Viral Video: बापाने मुलाकडून घेतली अशी शपथ, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक; 'स्वतःचा जीव पणाला लावून...'

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

SCROLL FOR NEXT