Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घराच्या दारामागे चुकूनही अडकवु नका 'या' गोष्टी

आपण अनेकदा आपल्या घराच्या दारावर हुक बसवतो जेणेकरून अनेक आवश्यक वस्तू तिथे अडकवता येतील. परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही अडकवल्या नको.

Puja Bonkile

Vastu Tips: कोणत्याही घराचे दरवाजे खूप महत्वाचे असतात. कारण तिथून संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील येते. त्यामुळे या दरवाजांची स्थिती आणि रंग याला खूप महत्त्व आहे. इतकंच नाही तर घरातील छोट्या वस्तू लटकवण्यासाठी आपण अनेकदा दारामागे हुक लावतो. नंतर यावर काहीही लटकवत असतो. जे वास्तुनुसार शुभ मानले जात नाही.
आपण अनेक वेळा या हुकवर कोणत्याही वस्तु लटकवुन ठेवतो. यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. या वस्तु कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

जुने फाटलेले कपडे

अनेक लोक न घालणारे किंवा फाटलेले जुने झालेले कपडे दारावर लटकवुन ठेवतात. कधी गरज पडली तर ते कपडे घालू असे अनेक लोक विचार करतात. परंतु असे कपडे लटकवुन ठेवणे शुभ मानले जात नाही. जर तुम्ही त्यांचा वापर करणार नसाल तर त्यांना फेकून द्यावे. अन्यथा घरात नकारात्मकता निर्माण करू शकतात.

चावी

काही लोक दाराच्या हुकवर चावीचा गुच्छा लटकवतात. पण चावीचा गुच्छा टांगल्यावर, दार उघडले किंवा बंद केल्यावर, चावी किंवा धातूचा वारंवार आवाज येतो. वास्तुनुसार असा धातूचा आवाज ऐकणे अजिबात चांगले मानले जात नाही. कारण त्यातून केवळ नकारात्मकता निर्माण होते. एवढेच नाही तर दारावरही खुणा राहतात. त्यामुळे अशा वस्तु लटकवुन ठेऊ नका.

चप्पल लटकवुन ठेऊ नका

अनेक लोकांना नवीन घेतलेली चप्पल किंवा शूज घरी आणल्यावर पॉलिथिनमध्ये ठेवतो आणि दाराच्या मागच्या हुकवर लटकतो. असे करणे वास्तुनुसार अशुभ मानले जाते.

स्कुल बॅग

अनेक लोक मुलांचे स्कुल बॅग त्यांच्या खोलीच्या दारामागील हुकवर लटकवतात. परंतु तुम्ही हे करणे टाळावे. कारण सर शाळेच्या दप्तरांचे वजन जास्त असते. तसेच दरवाजाची मागील बाजू नकारात्मक मानली जाते. त्यामुळे ज्ञान, बुद्धी आणि बुद्धीशी संबंधित गोष्टी तिथे ठेवणे अजिबात चांगले मानले जात नाही.

औषधांचे पॉलिथिन लटकवू नका

अनेक लोकांना दारामागील हुकवर औषधांची पॉलिथिन लटकवुन ठेवण्याची सवय असते. वास्तुनुसार असे केल्याने घरात नकारात्मकता येते. यामुळे घराच्या दारावर औषधांचे पॉलिथिन कधीही लटकवून ठेऊ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RO RO Service: कोकण रेल्वेच्या रो-रो कारसेवेला थंडा प्रतिसाद! अधिकाऱ्यांचे बुकिंगकडे लक्ष

Canacona: ..आणखी एका डॉल्फिनचा मृत्यू! काणकोण किनाऱ्यावर वाढत्या घटना; कारण अस्पष्ट

Naru Disease: गोवेकरांनो सावधान! फोंड्यात आढळला धोकादायक ‘नारू’? 25 वर्षांपूर्वी झाला होता देशातून नष्‍ट

Poingunin: काँग्रेसच्‍या काळात फक्त विकासकामांचे दगड! पंचायतमंत्री गुदिन्हो यांचा टोला; पैंगीणमध्ये सभागृहाचे उद्‌घाटन

Goa Live News: बोणबाग- बेतोडा येथे आढळले ६ गवे

SCROLL FOR NEXT