Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात 'या' दिशेला कपडे ठेवणे मानले जाते अशुभ, वाचा सविस्तर

वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या दिशेला कपडे ठेवणे शुभ मानले जाते.

Puja Bonkile

Right Direction For Cloths: वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तुचे खास महत्व आहे. त्या वस्तु ठेवण्यासाठी योग्य जागा वास्तुमध्ये सांगितले आहे. तसेच घरात कोणती वस्तु कुठे ठेवावी हे सांगितलेले आहे. कारण योग्य दिशेला वस्तु न ठेवल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते.

घरामध्ये कपडे ठेवण्याच्या योग्य जागेबाबत वास्तुशास्त्रात काही काही नियम सांगितलेले आहेत. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि संतुलन हवे असेल तर तुमचे कपडे योग्य दिशेने ठेवणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार कपडे कोणत्या दिशेला ठेवावे हे जाणून घेऊया.

  • उत्तर पूर्व दिशा

वास्तुशास्त्रानुसार स्वच्छ कपड्यांसाठी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे गरजेचे असते. कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची असते. यामुळे ही दिशा शुभ मानली जाते. उत्तर दिशेला कपडे ठेवल्याने धनाची हानी होत नाही. याशिवाय पूर्व दिशा ही सूर्याची दिशा असून ती नवनिर्मिती आणि उर्जेसाठी शुभ मानली जाते.

  • पुर्व-उत्तर

वास्तुशास्त्रानुसार अस्वच्छ कपडे पूर्व-उत्तर दिशेला ठेवणे अशुभ मानले जाते. कारण ही दिशा भगवान बृहस्पतिशी संबंधित आहे आणि बृहस्पति बुद्धी आणि उत्तम आरोग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिशेला अस्वच्छ कपडे ठेवल्यास आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

  • उत्तर दिशा

उत्तर दिशा ही धन आणि संपत्तीचे देवता कुबेर यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे चुकूनही अस्वच्छ कपडे या दिशेला ठेवू नका. त्यामुळे आर्थिक समस्या वाढू शकतात.

  • पूर्व दिशा

वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा ही सर्वात महत्वाची दिशा आहे आणि ती सूर्यदेवाची दिशा मानली जाते. त्यामुळे मुलांनी या दिशेला अस्वच्छ कपडे ठेवणे टाळावे. कारण त्यामुळे घरातील मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zuari Bridge Car Accident: झुआरी पुलावर बीएमडब्ल्यू कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

भिवपाची गरज आसा! गोव्यात कामगारांची पिळवणूक; विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर एकवटले

Hydroponic Farming: हायड्रोपोनिक्स! मातीविरहित शेती शिका, घरच्याघरी भाज्या मिळवा..

Video: गोरीलाला फुटला मायेचा पाझर! बाळाला आईच्या स्वाधीन केलं; भावूक करणारा व्हिडीओ

Goa News: पर्रा खून प्रकरण, आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT