वास्तूशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो. यामुळे लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर शुभ वस्तू लावतात. या गोष्टी लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो. जर तुम्हालाही तुमचा मुख्य दरवाजा सजवायचा असेल तर घराच्या मुख्य दरवाजावर कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात हे जाणुन घेऊया. (Vastu Tips for happy home)
* गणपती
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मुर्ती ठेवावी. गणपती घराच्या बाहेर न ठेवता आत ठेवा. बाहेर लावल्याने घरात पैशाची कमतरता भासते आणि गरिबी वाढते.
* स्वस्तिक
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावा. स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशा दोष दूर होतात.
* लक्ष्मीची पाऊले
लक्ष्मीची पाऊले घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने वास्तुशास्त्रानुसार (Vatushtra) घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते.
* मंगल कलश
मुख्य दारावर पाण्याने भरलेला कलश ठेवल्याने घरात समृद्धी येते. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. मुख्य दरवाजावर लावलेल्या कलशाचा चेहरा रुंद व खुला असावा. त्यात पुरेसे पाणी आणि फुलांच्या पाकळ्या टाका.
* हार
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचा हार लावा. आंब्याच्या पानांमध्ये आनंद आकर्षित करण्याची क्षमता असते. याच्या पानांचा विशेष सुगंधही मनातील चिंता दूर करतो. त्यामुळे आंब्याच्या पानांपासून बनवलेला हार घराच्या मुख्य दारात लावला जातो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.