Valentine's Day 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentines Day: जोडीदाराला व्हॅलेंटाईन गिफ्ट देताना फॉलो करा 'या' वास्तु टिप्स, वाढेल अधिक प्रेम

व्हॅलेंटाईन डेनिमित्त वास्तुशास्त्रानुसार जोडीदाराला गिफ्ट दिल्यास नात्यात प्रेम वाढण्यास मदत मिळते.

Puja Bonkile

Vastu Tips For Valentines Gift: फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना असे मानतात. प्रेमी युगलसाठी हा महिना खास आहे. कारण याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे येतो. प्रेमळ जोडपे हा दिवस संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतात.

या दिवशी आपल्या जोडीदाराला काही खास गिफ्ट देतो. अनेक वेळा या दिवशी काही खास भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त केले जाते. तुम्हीही 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ची वाट पाहत असाल वास्तुनुसार तुम्ही तुमच्या जोडीदाराला कोणती भेटवस्तू देऊ शकता हे जाणून घ्या

वास्तुनुसार पुढील गिफ्ट देऊ शकता

बांबू प्लांट

वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोप खूप शुभ मानले जाते. बांबू वनस्पती हे प्रगती आणि समृद्धीचे प्रतिक देखील मानले जाते. अशावेळी जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन डेला बांबूचे रोप गिफ्ट केले तर तुमचे नाते घट्ट राहील.

लाफिंग बुद्धा

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाफिंग बुद्धा गिफ्ट म्हणून देऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धाला शुभ मानले जाते. लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्याने शांतता कायम राहते.

फुले

वास्तुशास्त्रानुसार फुलं देणे देखील शुभ मानले जाते. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल आणि गुलाबी रंगाचे फुल देऊ शकता. मात्र, फुलं देताना त्यात काटे नसावेत. काट्यामुळे नातेसंबंधात संघर्ष होऊ शकतो.

गिफ्ट रॅपचा रंग

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला यापैकी एखादी भेटवस्तू दिली तर भेटवस्तू रॅप करण्यासाठी वापरण्यात येणारा कागद कोणत्या रंगाचा आहे हे देखील लक्षात ठेवा. रॅपिंगसाठी गोल्डन, लाल, गुलाबी, पिवळा रंग वापरावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT