Silicone Cookware Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Silicone Cookware वापरता; मग ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे

सिलिकॉन कुकवेअर जगात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आणि सर्वात लोकप्रियअसे कुकवेअर आहे.

दैनिक गोमन्तक

कुकवेअर म्हणजेच अन्न शिजवण्याची भांडी या मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. बदलत्या काळानुसार, याची डिझाईन्स देखील बदलत आहेत. त्याचे प्रकार बदलत आहे अशीच एक कुकवेअर म्हणजे सिलिकॉन. हे स्वयंपाक आणि बेकिंग हेतूसाठी सामान्यतः वापरले जाते. हा चमकदार आणि सुंदर दिसणारा कुकवेअर सेट जगातील प्रत्येक घरात दाखल झाला आहे. यात लवचिक साचे, जे आपण केक, मफिन कप, चॉकलेट, बर्फाचे साचे इत्यादी साठी वापरतो. परंतु सिलिकॉन कुकवेअरच्या वापरावरून बरऱ्याच लोकांमध्ये द्विधा मनस्थिती आहे. या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Types of Silicone Cookware

सिलिकॉन कुकवेअर म्हणजे काय?

सिलिकॉन हा एक सिंथेटिक रबर आहे; जो ऑक्सिजन आणि कार्बनच्या एकत्रिकरणाने बनविला जातो पण तरीही, हे घटक नैसर्गिकरित्या उद्भवणारे असून वापरण्यास सुरक्षित आहेत. हे कुकवेअर उष्णता-सहनशील म्हणजेच मॅक्रोवेव वापरासाठी तसेच फ्रीजरसाठी सुरक्षित आहे. परंतु याच्या तपमानवर मर्यादा आहेत. याचे तापमान आपण 428 अंश फॅरेनहाइट किंवा 220 सेल्सियसपेक्षा जास्त ठेवू शकत नाही.

”बाजारात विविध प्रकारच्या कुकवेअरची आवक वाढल्याने,विशेषत: बेकिंगच्या बाबतीत सिलिकॉन कुकवेअर मोठ्या प्रमाणात बाजारात आले आहेत, सिलिकॉन कुकवेअर मुळात सिलिकॉन आणि ऑक्सिजनचा बनलेला रबर आहे, हा स्वयंपाक करताना सुरक्षित आहे. अ‍ॅल्युमिनियम, स्टेनलेस स्टील्स, नॉन -स्टिक पॅनच्या तुलनेत स्वयंपाक आणि बेकिंगसाठी हा एक चांगला पर्याय आहे. जेव्हा बेकिंगचा प्रश्न येतो, तेव्हा सिलिकॉन बेकिंग पेपरऐवजी पर्याय म्हणून उत्तम कार्य करते.

Types of Silicone Cookware

सिलिकॉन इन्फ्यूज्ड कुकवेअर वापरणे सुरक्षित आहे का?

सिलिकॉन कुकवेअर जगात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते आणि सर्वात लोकप्रिय आहे. अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जर तापमानाचे उल्लंघन केले गेले नाही आणि उष्णतेच्या तपमानात ते चांगले वापरले गेले तर ते सिलिकॉनचे अवशेष सोडत नाही. तथापि, कमी दर्जाचे सिलिकॉन अवशेष मागे सोडू शकते. म्हणूनच सिलिकॉन कुकवेअर निवडताना नेहमी उच्च दर्जाचेच घ्या.

सिलिकॉन कुकवेअर सुरक्षित कसे ठेवायचे?

  • प्रीमियम किंवा उच्च दर्जाचे सिलिकॉन कुकवेअर निवडा.

  • कुकवेअर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकाचे गुणधर्म आणि तपशील लक्षात घ्या.

  • कोणतेही कट किंवा स्क्रॅच नाहीत याची खात्री करा कारण ते गरम करताना किंवा स्वयंपाक करताना रसायनिक घटक सोडण्याचा मार्ग मोकळा करते.

  • त्यांना डिशवॉशर किंवा मेटल स्क्रबरमध्ये धुवू नका कारण यामुळे संयुगे बाहेर पडू शकतात ज्यामुळे जास्त नुकसान होते.

Types of Silicone Cookware

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT