unique tradition in beed performed on holi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गाढव तर वरातीला येतील पण जावई येतील का?

जावयाला गाढवावरून होळीच्या दिवशी चपलांचा हार घालून मिरवणूक काढण्याची परंपरा

दैनिक गोमन्तक

बीड : महाराष्ट्रात धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धुलिवंदन हा एक रंगांचा उत्सव असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात. दरम्यान बीड येथे एक अनोख्या पद्धतीने धुलीवंदन साजरे केले जाते. केज तालुक्यातील विडा गावात, जावयाला गाढवावरून होळीच्या (holi) दिवशी चपलांचा हार घालून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.

विडा गावातील नागरिकांच्या शोधामुळे जावई पसार झाले आहेत. गेल्या 90 वर्षा पासून जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची परंपरा (Tradition) आहे. धुलीवंदनाचा उत्सव साजरा करण्यासाठी विड्याच्या ग्रामस्थांची बैठक पार पडली आहे. यंदा होळीच्या सणाला जावयाच्या शोधा बरोबरच आता गाढवाचाही शोध गावकऱ्यांना घ्यावा लागत आहे.

कोरोनामुळे सामाजिक, राजकीय (Politics) सण उत्सव साजरी करन्यावर बंदी होती. म्हणून 2 वर्षात परिसरातील जावई व घरजावई यांना सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, कोरोना (corona) आटोक्यात आल्यानंतर पुन्हा सर्वच कार्यक्रम सुरू झाले आहेत. उद्या शुक्रवारी हा कार्यक्रम सकाळी 11 वा होणार आहे. कार्यक्रम उद्या होणार खर पण होळीच्या या अनोख्या परंपरेमुळे जावई पसार झाले आहेत. आणि गाढवांना सुद्धा मानपान लागतोय. गाढवांना मागेल ती सुपारी देऊन वरातीसाठी नेल जातय. गाढव तर वरातीला येतील पण जावई येतील का? हा प्रश्न उभा राहिलाय….

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT