Unique Flowers Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Unique Flowers: हो खरंच...! 'या' 5 झाडांची फुलं दिसतात प्राण्यांसारखी

तुम्हीही ही झाडे पाहून चकितच व्हाल...! कारण ही फुल अगदी प्राण्यासारखी दिसतात.

Puja Bonkile

Unique Flowers: निसर्ग हा जीवजंतू आणि वनस्पतींच्या विविध प्रजातींनी समृद्ध आहे. त्या प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि पैलू आहेत जे त्यांना अद्वितीय बनवतात. असे मानले जाते की जगभरात वनस्पतींच्या 4 लाखांहून अधिक प्रजाती आहेत, त्यापैकी काहींची फुले अगदी प्राण्यांसारखी दिसतात. आज अशाच 5 विदेशी वनस्पतींबद्दल जाणून घेऊया ज्यांच्या फुलांचा आकार प्राण्यांसारखा दिसतो.

Butterfly Wings

क्रिस्टिया व्हेस्पर्टिलिओनिस

या झाडांच्या फुलांना बटरफ्लाय विंग म्हणून ओळखले जाते. उडणाऱ्या फुलपाखरांच्या कळपासारखे दिसणारे, बटरफ्लाय विंग हे दक्षिणपूर्व आशियातील एक दुर्मिळ उष्णकटिबंधीय फूल आहे. ते सुमारे 60 ते 120 सेंटीमीटर उंच वाढू शकते. हे फुल दुर्मिळ असूनही, असे म्हटले जाते की हे फूल कुठेही सहजपणे वाढू शकते.

Unique Flowers

कॅलियाना मेजर

या झाडांच्या फुलांना फ्लाइंग डक ऑर्किड असे म्हणतात. कारण हे फुल बदकाचे पिल्लू उडत आहे असे दिसते. मात्र, हे फूल पाहण्यासाठी तुम्हाला ऑस्ट्रेलियाला जावे लागेल. कारण ते फक्त ऑस्ट्रेलियाच्या घनदाट जंगलात आढळते. याचे कारण असे की या फुलाला उगवण्यासाठी एका विशेष प्रकारची बुरशी लागते आणि ती फक्त ऑस्ट्रेलियन जंगलातच आढळते.

Unique Flowers

इंपेतिन्स सिटासिना

थायलंड, बर्मा आणि भारत यांसारख्या आशियाई देशांमध्ये आढळणाऱ्या इंपेतिन्स सिटासिना नावाच्या झाडांची फुलं पोपटासारखी दिसतात. म्हणून त्यांना पॅरेट फ्लॉवर म्हणतात. ही फुले 50 सेमी उंच वाढतात आणि 3 पाकळ्यांसह 3 सेपल्स असतात.

ही फुले हलक्या जांभळ्या आणि लाल रंगाची असतात. जी कधी कधी दिसायला उडणाऱ्या पोपटांसारखी दिसतात.

Unique Flowers

ओफ्रिस एपिफेरा

युरोप आणि पश्चिम आशियामध्ये आढळणारी ओफ्रीस एपिफेरा ही एक बारमाही औषधी वनस्पती आहे. साधारणतः एक फूट उंचीची असते. ज्याला मधमाशी ऑर्किड म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे ही फुले मधमाशांसारखी दिसतात. या फुलांचा रंग हुबेहुब मधमाशीसारखा असतो आणि त्यावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रेषाही असतात.

Unique Flowers

ड्रॅकुला सिमिया

ड्रॅकुला सिमिया झाडांच्या फुलांना मंकी फेस ऑर्किड म्हणतात. हे सामान्यतः पेरू आणि इक्वाडोर देशांमध्ये आढळते. ही फुले विविध प्रकारच्या माकडांसारखी दिसतात आणि तुम्हाला या फुलाचे डोळे, हात, नाक आणि दाढी इत्यादी दिसतात. त्यांचा सुगंध पिकलेल्या संत्र्यासारखा असतो आणि ते ठराविक हंगामी फूल नाही कारण ते नैसर्गिक अधिवासात कधीही फुलू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

मुस्लिम राष्ट्रासाठी पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करण्यात आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

IND vs PAK: ‘इतकी धुलाई करतील की...' पाकिस्तानी दिग्गजाला भारतीय बॅटर्स धास्ती; आशिया कपमधील भारत-पाक सामन्यावर मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT