Turmeric Hair Spray Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Turmeric Hair Spray: पांढऱ्या केस काळे करण्यासाठी असा करा 'हळदी'चा उपयोग

Turmeric Hair Spray: हळद केसांसाठी टॉनिक म्हणून काम करते, ज्यामुळे केसांना मुळापासून पोषण मिळते.

दैनिक गोमन्तक

Turmeric Hair Spray: आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवर देखील झालेला दिसून येतो. केस गळती, टक्कल पडणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे, केस रुक्ष होणे असे अनेक प्रकार दिसून येतात.

त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण अनेक उपाययोजना करत असतो. या उपायांमध्ये अनेकदा पारंपारिक औषधे, वनस्पती यांचादेखील समावेश असतो. पण तुम्ही केसांसाठी कधी हळदीचा वापर केला आहे का?

हळद हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असा आहे, त्यामुळे हळदीचे एकच नाही तर अनेक फायदे आहेत. हळदीचा वापर अनादी काळापासून अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जात आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का की हळद केवळ तुमची त्वचा उजळण्यासाठीच नाही तर केसांना निरोगी बनवण्यासाठीही उपयुक्त आहे? पांढरे केस मुळापासून काळे करायचे असतील तर हळदीचा हेअर स्प्रे सर्वोत्तम ठरू शकतो. हळद केसांसाठी टॉनिक म्हणून काम करते, ज्यामुळे केसांना मुळापासून पोषण मिळते.

हळदीचा हेअर स्प्रे कसा बनवायचा?

केसांसाठी हळद स्प्रे बनवण्यासाठी सर्वप्रथम एक बाऊल घ्या. त्यात 1चमचा हळद आणि 1 कप पाणी घाला. यानंतर, त्यात थोडेसे कोरफडचे जेल घालून मिक्स करा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून साठवा. आता तुमचा केसांसाठी हळद स्प्रे तयार आहे.

केसांमध्ये हळदीचा स्प्रे कसा वापरावा?

केसांमध्ये हळदीचा स्प्रे घ्या आणि मुळापासून चांगला लावा. केसांना हाताने हलके मसाज करा. सुमारे 1-1.5 तास केसांवर राहू द्या. त्यानंतर तुम्ही केस नीट धुवून स्वच्छ करा. यामुळे तुमचे केस जाड आणि चमकदार दिसतात. हा स्प्रे लावण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT