Home Remedies For Period Rash Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies For Period Rash: मासिक पाळीत पॅड रॅशेसचा होतोय त्रास? वापरा 'या' 4 ट्रिक्स

तुम्हालाही जर मासिक पाळी दरम्यान पॅडच्या रॅशेसचा त्रास होत असेल तर या नैसर्गिक पद्धतींचा वापर करावा.

Puja Bonkile

Home Remedies For Period Rash: मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात महिलांना मुड स्विंग होतात. तसेच गॅस होणे, पाय दुखणे, पोट दुखणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अनेक महिलांना सॅनिटरी पॅड्सचा वापर केल्याने रॅशची समस्याही होऊ लागते. या समस्येमध्ये, प्रत्येकाला खूप अस्वस्थ वाटू लागते. कारण या रॅशेसमुळे तीव्र खाज सुटू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकता.

  • बेकिंग पावडर

मासिक पाळी दरम्यान तुम्हाला जर खाज किंवा लालसरपणा येत असेल तर कमी करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी दोन चमचे बेकिंग पावडर घ्या आणि एक कप पाण्यात मिक्स करा. हे मिश्रण पुरळांवर लावा आणि ते सुकू द्यावे. नंतर थंड पाण्याने धुवावे. धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेल किंवा मऊ कापडाने प्रभावित क्षेत्र कोरडे करा.

  • अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर त्वचेवर होणारी खाज कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही थोड्या प्रमाणात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्यावे आणि त्यात कापसाचा गोळा बुडवून रॅशेसवर लावावे. नंतर ते सुकू द्यावे. तुम्ही हे दिवसातून तीनदा करू शकता.

  • बर्फ

मासिक पाळीत होणारी वेदना आणि सूज कमी करण्यासाठी बर्फ फायदेशीर ठरतो. तुम्हाला फक्त दोन बर्फाचे तुकडे घ्यायचे आहेत, ते एका स्वच्छ कपड्यात गुंडाळून प्रभावित भागावर लावायचे आहेत. असे केल्याने मज्जातंतू सुन्न होईल आणि तुम्हाला लगेच आराम मिळेल.

  • खोबरेल तेल

खोबरेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. अशावेळी हे तेल रॅशवर उत्तम उपाय आहे. हे तुमच्या त्वचेला मॉइश्चराइझ देखील करते. ते लावण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी प्रभावित भाग थंड पाण्याने स्वच्छ करा आणि कापसाच्या बॉलने त्या रॅशेसवर खोबरेल तेल लावावे. रात्रभर राहू द्यावे. तुम्ही हे तेल सकाळी आंघोळीनंतरही लावू शकता.

टिप: कोणतेही साबण, बॉडी वॉश, किंवा व्हॅसलिनचा वापर करू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT