Republic Day 2023 Tricolour Sandwich Recipe : दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या खास दिवशी ऑफिसपासून शाळेपर्यंत लोक तिरंगा आणि देशभक्तीच्या भावनेत तल्लीन होतात.
तुम्हालाही या खास दिवसाचे महत्त्व मुलांना समजावून सांगायचे असेल तर त्यांच्या टिफिनमध्येही तिरंगा पदार्थ देउ शकता. ट्राय कलरच्या रेसिपीमुळे त्यांना पौष्टिक घटक तर मिळतीलच, पण त्यांचे सामान्य ज्ञानही वाढेल. चला तर मग जाणून घेऊया ट्राय कलर सँडविच कसा बनवायचा.
ट्राय कलर सँडविच बनवण्यासाठी साहित्य
- ब्रेड स्लाईस 8-10
- अर्धी वाटी किसलेला कोबी
- अर्धी वाटी किसलेले गाजर
- एक वाटी मेयोनीज
- दोन चमचे टोमॅटो केचप
- दोन चमचे हिरवी चटणी
- चवीनुसार मीठ
- दोन चमचे बटर
ट्राय कलर सँडविच बनवण्याची कृती
तिरंगा सँडविच बनवण्यासाठी प्रथम ब्रेडच्या काठावरुन चाकूच्या मदतीने तपकिरी भाग काढून टाका. कोबी आणि गाजर दोन वेगळ्या भांड्यात काढा. एकामध्ये मेयोनीज आणि थोडे मीठ एकत्र करून मिक्स करावे.
दुसऱ्या भांड्यात केचप मिक्स करून ठेवा. ब्रेडचा स्लाईस घ्या आणि त्यावर बटर पसरवा. पुदिन्याच्या चटणीसह भाज्यांचे मिश्रण पसरवा आणि त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा. त्यावरही बटर लावा आणि भाज्यांचे मिश्रण केचपसोबत ठेवा. ब्रेडच्या दुसऱ्या स्लाईसने झाकून ठेवा.
सँडविच टोस्ट करा
तुम्हाला हवे असल्यास हे सँडविच असे कापून सर्व्ह करा किंवा हँड सँडविच मेकरमध्ये ठेवून भाजून घ्यावे. तिरंगा सँडविच तयार आहे. टिफिनमध्ये द्या किंवा सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना आणि मोठ्यांना सर्व्ह करा. तुम्ही हे इव्हनिंग स्नॅक्स म्हणूनही ट्राय करु शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.