Travel Workout Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Workout: जंपिंग जॅक,जंप स्क्वॉव्टस अन् बरेच काही! 'या' पाच Exercise करतील तुमच्या सुट्यांचा आनंद द्विगुणित

तुम्हीही सुट्ट्यांमध्ये स्वत:ला फिट ठेवण्याचा विचार करत असाल तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करु शकता.

Puja Bonkile

Travel Workout: आजकालच्या धावपळीच्या या जगात अनेक लोक सुट्ट्यांमध्ये निवांत वेळ घालवतात. पण काही लोक असे आहेत जे सुट्ट्यांमध्ये देखील स्वत:ला फिट आणि निरोगी ठेवण्यावर भर देतात.

पण संतुलित आहार, योगा करुन देखील पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. तुम्ही सेलिब्रिटी फिटनेस एक्सपर्ट अनुष्का परवानीने सांगितलेले योग प्रकार करुन कॅलरीज बर्न करुन स्वत:ला फिट आणि निरोगी ठेऊ शकता.

Jumping jack
  • जंपिंग जॅक

हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जमिनीवर सरळ उभे राहून पाय एकमेकांपासून थोडे दूर ठेवावे लागतील. हात शरीराच्या दोन्ही बाजूंनी जवळ ठेवावे लागतील. आता हवेत उडी मारा आणि तुमचे पाय खांद्याच्या रुंदीवर पसरवा. आणि आपले हात आपल्या डोक्यावर घ्या. आता तुमच्या पहिल्या स्थानावर परत जा आणि पाय एकत्र ठेवा.असे २ मिनिटं करावे.

jump squat
  • जंप स्क्वॉव्टस

हा व्यायाम करण्यासाठी आपले पाय खांद्याच्या रुंदीच्या बाजूला ठेवून उभे रहा. आता तुमचे गुडघे 90 अंशांवर वाकवा आणि स्क्वॉट स्थितीत या. यादरम्यान, तुमचे नितंब गुडघ्याखाली जाऊ नयेत याची काळजी घ्या. आता वरच्या दिशेने उडी घ्या आणि तुमचे दोन्ही हात हवेत वर करा. यानंतर स्क्वॉट स्थितीत परत या.

Inchworms
  • इंचवर्म्स

हा योग प्रकार १० वेळा करावा. सरळ उभ राहावे. मग खाली वाकून हातावर चालावे आणि परत वापस यावे आणि सरळ उभे राहावे. असे केल्याने कॅलरीज कमी होण्यास मदत होईल.

headstand
  • हेडस्टँड

या योग प्रकारत डोक्यावर उभे राहावे लागते. यासाठी खुप सराव कराव करण्याची गरज असते. नियमितपणे असेल केल्यास शरिरातील कॅलरीज कमी होण्यास मदत मिळते.

ट्रेनरच्या मते हे फिटनेस रूटीन नियमितपणे फॉलो केल्यास तुम्हाला दीर्घकाळ मदत होईल. तुमचा तणाव कमी होऊन दिवसभर एनर्जेटिक वाटेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT