Online Travel Scam: सोशल मिडिया आणि तत्रंज्ञानाच्या वाढत्या प्रमाणामुळे दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणूक वाढत आहे. यामुळे नागरिकांनी वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.
अलिकडे ऑनलाइन ट्रॅव्हल स्कॅमचे प्रमाण वाढले आहे. तुम्हा जर ऑनलाइन ट्रॅव्हल बुक करत असाल ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे.
कारण यामध्ये ट्रिपला जाण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल स्कॅम कसे टाळता येईल हे जाणून घेउया.
ऑनलाइन ट्रॅव्हल स्कॅमपासून कसे दुर राहाल
ट्रॅव्हल बुकिंगशी संबंधित कोणत्याही ईमेलवर क्लिक करू नका. विशेष म्हणजे एखादी लिंक संशयास्पद वाटत असल्यास किंवा अनोळखी वाटत असेल तर त्यावर क्लिक करु नका. अशा मेलला रिप्लाय देणं धोकादायक ठरू शकते. ट्रॅव्हल बुकिंगसाठी फक्त प्रसिद्ध कंपनीकडूनच बुक करावे.
सुट्ट्यांमध्ये सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरताना काळजी घ्यावी. तुम्हालाही वाय-फाय वापरायचे असेल, तर आधी नेटवर्क अतिशय सुरक्षित असल्याची खात्री करुन घ्यावी. यासोबतच VPN चा वापर करावा. हे तुमचा वैयक्तिक डेटा आणि ऑनलाइन अँक्टिव्हिटी सुरक्षित ठेवते.
खाजगी कंपनीकडून सुट्टीसाठी भाड्याने बुकिंग करतांना, पब्लिक रिकॉर्ड पहिले तपासावे. तुम्ही कुठे राहणार आहात याची कायदेशीरता खात्री करुन घ्यावी.
वायर ट्रान्सफर, प्रीपेड कार्ड किंवा गिफ्ट कार्डद्वारे पेमेंट करणे टाळले पाहिजे. कारण जर
तुमची फसवणूक होउन चांगलेच आर्थिक नुकसान होउ शकते. यामुळे वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.
तुमच्या डिवाइसेमध्ये चांगले अँटीव्हायरस आणि सिक्योरिटी सॉल्यूशन्स असणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही चुकून एखाद्या चुकीच्या ट्रॅव्हल वेबसाइटवर गेलात तरीही त्या वेबसाइटमुळे तुमच्या डिव्हाइसला कोणतेही नुकसान होणार नाही.
गोव्यातील या सुंदर बेटांना द्या भेट
तुम्ही जर दक्षिण गोव्यात रहात असाल तर पाळोले समुद्र किनाऱ्यापासून जवळ असलेल्या ‘कोणको’ या बेटाला भेट देऊन तिथे संपूर्ण दिवस व्यतीत करणे आनंदाचेच असेल. हे बेट ‘मंकी आयलंड’ (Monkey Island) म्हणूनही ओळखले जाते.
या बेटावरच्या जंगलात असणाऱ्या माकडांमुळे बेटाला हे नाव मिळाले आहे. या बेटावर जाण्यासाठी पाळोले इथून लहान बोटी आहेत. स्वत:चे जेवण घेऊन जात असाल तर या बेटावर एक दिवसाची तुमची आनंदाची सहल होऊ शकते.
पाळोले किनाऱ्यावरूनच बोटीने जाता येणारे दुसरे बेट म्हणजे ‘बटरफ्लाय आयलंड’ (Butterfily Island) . आकाशातून हे बेट एखाद्या फुलपाखरांसारखे दिसते म्हणून ते ‘बटरफ्लाय आयलंड’.
या अर्धवर्तुळाकृती बेटावर आपला दिवस अतिशय निवांतपणे जाईल आणि आपण जर नशीबवान असाल तर तिथल्या समुद्रात पोहणाऱ्या डॉल्फिन माशांशीही तुमची गाठ पडू शकेल. बेटांवर असताना तिथल्या समुद्रात पोहणे किंवा तिथून सूर्यास्ताचा आनंद घेणे हा अकल्पित अनुभव असेल.
तुम्ही उत्तर गोव्यातील (Nort Goa) रायबंदर किंवा ओल्ड गोव्याच्या (Old Goa) समोर असणाऱ्या अनुक्रमे चोडण आणि दिवाडी बेटांवर, येताजाता कधीतरी नक्कीच पोहचला असाल. दिवाडीच्या ‘बोंदराच्या फेस्ता’चा आनंदही आपण घेतला असेल, पण वास्को (Vasco) शहरापासून सहा-सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंट जासिंतो बेटावर मात्र जाण्याचा योग आपल्याला क्वचितच आला असेल.
हे बेट मुख्य रस्त्याशी पुलाद्वारे जोडले गेले असल्याने तिथे जाण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. एखाद्या संध्याकाळी या बेटावर जाऊन तिथल्या पायवाटेने सबंध बेटाला तुम्ही फेरी घालू शकता. बेटाच्या पलीकडच्या बाजूला एक इवलासा किनाराही आहे. चालत चालत बेटावरच्या डोंगरमाथ्यावर गेलात तर तिथून दिसणारे आसपासचे दृश्य, सूर्यास्त नजरेत साठवून ठेवण्याजोगे नक्कीच आहे.
ज्यांना आपल्या माणसांसोबत निसर्गाच्या सानिध्यात रमण्याचा आनंद घ्यायचा आहे तर या बेटांवर नक्की भेट द्या. ‘नवीन जागा आणि नवीन आनंद’ असेच या भेटीचे सार असेल आणि पाण्याने घेरलेल्या या जागा आपल्याला थोडेसे अलिप्तचेही सुख देतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.