Clothes Washing Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: टॉवेल धुतल्यानंतर कडक होत असेल तर या ट्रिक्स वापरा, कापड राहिल मऊसुत

जर तुम्हीही टॉवेल चुकीच्या पद्धतीने धुत असाल तर कडक आणि कोरडे होते.

Puja Bonkile

Towels Washing Tips: आपण सर्वजण आंघोळीनंतर आणि हात-पाय धुतल्यानंतर टॉवेल वापरतो. पण टॉवेल जास्त वापरल्याने आणि चुकीच्या पद्धतीने धुतल्यास टॉवेल कडक होतो. त्यामुळे पुन्हा वापरण्यासाठी योग्य नसतो. यामुळे आपण नवीन टॉवेल खरेदी करण्याचा विचार करतो. तुम्हाला जर टॉवेल सॉफ्ट असावा असे वाटत असेल कर पुढिल काही ट्रिक्स वापरू शकता

  • टॉवेल कडक का होतो

जर तुमचा टॉवेल देखील धुतल्यानंतर कडक झाला असेल तर ते जास्त डिटर्जंट वापरल्यामुळे असू शकते . कारण पाण्याने धुतल्यानंतरही तो टॉवेलमधून पूर्णपणे निघत नाही. त्यामुळे तो सुकल्यावर कोरडा होतो. तसेच, जर तुम्ही फॅब्रिक सॉफ्टनर वापरत असाल, तर टॉवेल कडक होतो.

  • डिटर्जंटचा योग्य वापर

टॉवेल धुताना शक्य तितक्या कमी डिटर्जंटचा वापर करावा. जर तुम्ही मशिनमध्ये कपड्याच्या इतर अनेक वस्तूंसह टॉवेल धुत असाल तर कमी डिटर्जंट वापरावे. यामुळे टॉवेल स्वच्छ धुतला जातो.

  • गरम पाण्यात टॉवेल धुवावा

गरम पाण्यात टॉवेल धुतल्याने डिटर्जं पुर्णपणे निघून जातो. जर तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये टॉवेल धुत असाल तर सर्वात पहिले गरम पाणी आणि डिटर्जंट वॉशरमध्ये चांगले विरघळू घ्यावे त्यानंतर काही मिनिटांनी टॉवेल त्यात टाका.यामुळे टॉवेल स्वच्छ तर निघतो णि कडक देखील होत नाही.

  • व्हिनेगरचा वापर करावा

टॉवेलवरचे डाग कमी करण्यासाठी आणि कापड मऊ ठेवण्यासाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. टॉवेल व्हिनेगरच्या पाण्यात 2-3 महिन्यांतून एकदा धुवावा.यामुळे टॉवेलचा कापड सॉफ्ट राहिल.

  • डिटर्जंट आणि बेकिंग सोड्याचा वापर

डिटर्जंट आणि बेकिंग सोडाच्या मिश्रणात टॉवेल धुणे खूप फायदेशीर आहे. कारण असे केल्याने टॉवेल देखील मऊ राहतात, तसेच ते डाग आणि दुर्गंधी देखील पूर्णपणे कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT