Top Tourist Places Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Top Tourist Places: मनाची शांती आणि डोळ्यांचं सुख हवंय? मग 'या' ठिकाणी एकदा जाऊन या

Famous Tourist Places: सुट्ट्यांचा हंगाम म्हणजेच कुटुंबासोबत वेळ घालवण्याची, नव्या ठिकाणी जाण्याची, विविध संस्कृती अनुभवण्याची आणि दैनंदिन धकाधकीतून थोडा विसावा घेण्याची उत्तम संधी असते.

Sameer Amunekar

सुट्ट्यांचा हंगाम म्हणजेच कुटुंबासोबत वेळ घालवण्याची, नव्या ठिकाणी जाण्याची, विविध संस्कृती अनुभवण्याची आणि दैनंदिन धकाधकीतून थोडा विसावा घेण्याची उत्तम संधी असते. भारतात अशी अनेक सुंदर, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली शहरे आहेत, जिथे फिरायला गेल्यावर सुट्टी एक खास अनुभव ठरते. जर तुम्हीही या सुट्टीत फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेली ठिकाणं तुमच्या यादीत नक्की असायला हवीत.

शिमला, हिमाचल प्रदेश

हिवाळ्यात बर्फाच्छादित डोंगर, उन्हाळ्यात थंड हवामान आणि वर्षभर अप्रतिम निसर्गसौंदर्य – शिमला हे वर्षभर पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. ब्रिटिश काळातील वास्तुकला, मॉल रोडवरील खरेदी, आणि कुफ्रीमधील अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स हे येथे विशेष आकर्षण आहेत. कुफ्री, मॉल रोड, रिड्ज मैदान, टॉय ट्रेन हे येथील प्रमुख आकर्षण आहे. मार्च ते जून हा फिरण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.

जयपूर

‘पिंक सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेले जयपूर हे राजस्थानचे हृदय मानले जाते. इथल्या किल्ल्यांची भव्यता, हवामहलचा आकर्षक रचना, राजवाड्यांमधील आलिशान सौंदर्य आणि हस्तकलेच्या वस्तू हे सगळं पर्यटकांना मोहवून टाकतं. आमेर किल्ला, हवामहल, सिटी पॅलेस, चौखी धाणी हे येथील प्रमुख आकर्षण आहे.

गोवा

जर तुम्हाला निसर्ग, नाईटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव हवा असेल तर गोवा हे एक उत्तम ठिकाण आहे. उत्तरेला पार्टी कल्चर, दक्षिणेला शांत किनारे आणि मध्यभागी संस्कृती व इतिहासासाठी गोवा हे एक परिपूर्ण सुट्टीचं ठिकाण आहे. बागा बीच, पाळोले बीच प्रसिद्द आहे

मुनार, केरळ

थंड हवामान, चहा मळे, धबधबे आणि धुक्यांनी वेढलेले पर्वत यांसाठी प्रसिद्ध असलेलं मुनार हे नैसर्गिक सौंदर्यप्रेमींसाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे. शांतता आणि निसर्गाची साधना करायची असेल तर मुनार नक्की निवडा.

वाराणसी

गंगेच्या किनाऱ्यावर वसलेलं वाराणसी हे भारतातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. इथली गंगा आरती, घाटांवरील गतीशीलता, गल्लीतील चविष्ट खाणं आणि अध्यात्मिक वातावरण पर्यटकांच्या मनात कायमचं घर करतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT