"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

goa taxi scam viral video: जर्मनीमधील एका प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला,ज्यात काही स्थानिक टॅक्सीचालक पर्यटकांना एका राइडसाठी ४५० रुपये मागतात
taxi scam in goa
taxi scam in goaDainik Gomantak
Published on
Updated on

german influencer in goa: सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे आणि जगभरातील पर्यटक गोव्याला भेट देत आहेत. मात्र, गोव्यातील स्थानिक टॅक्सी व्यवसायातील गैरप्रकार आणि मनमानी पुन्हा एकदा घटनेमुळे समोर आली आहे. जर्मनीमधील एका प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.

४५० विरुद्ध ३०० रुपये; टॅक्सीचा वाद

या व्हायरल व्हिडिओमध्ये जर्मनीचे एक पुरुष आणि एक महिला पर्यटक गोव्यात टॅक्सी शोधताना दिसतात. त्यांचा अनुभव असा आहे की, काही स्थानिक टॅक्सीचालक पर्यटकांना एका राइडसाठी ४५० रुपये मागतात. या पर्यटकांनी स्थानिक ॲप 'गोवा माईल्स' वापरला आणि त्यांना तीच राइड फक्त ३०० रुपयांमध्ये मिळाली. या स्वस्त दरामुळे त्यांनी 'गोवा माईल्स' ॲपची टॅक्सी घेऊन प्रवास सुरू केला.

taxi scam in goa
Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

पोलिसांची कारवाई; ५०० रुपयांचा दंड

पर्यटकांनी टॅक्सी घेतली तेव्हा काही स्थानिक लोक त्यांचा पाठलाग करत असल्याचा दावा त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. यानंतर लगेचच पुढे काही पोलिसांनी त्यांच्या टॅक्सीला अडवले. पोलिसांनी टॅक्सी थांबवल्यानंतर पर्यटकांकडून ५०० रुपयांचा दंड आकारला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, टॅक्सी चालकाऐवजी पर्यटकांनीच हा दंड भरला.

या सर्व प्रकाराने जर्मन पर्यटक पूर्णपणे गोंधळले आणि त्यांनी व्हिडिओमध्ये गोव्यात हे काय चालले आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. टॅक्सीवाल्यांच्या कथित 'स्कॅम'मधून सुटका मिळवल्यानंतरही पोलिसांकडून दंड भरावा लागल्याने पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com