Bestselling Smartphones Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bestselling Smartphones: Amazon वर हिट आहेत 'हे' 4 स्मार्टफोन

जर तुम्ही मिड-रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Puja Bonkile

Bestselling Smartphones: जर तुम्ही कमी बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Amazon वर Samsung, OnePlus, iQOO, Realme सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. या स्मार्टफोन्समध्ये युजर्संना पावरफुल बॅटरीसह दमदार फिटर्सही मिळतात. Amazon वर उपलब्ध असलेल्या हिट 4 स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया जे सर्वाधिक विकले जातात.

  • OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus Nord CE 3 Lite 5G हा स्मार्टफोन 21,999 रुपयांना खरेदी करता येईल. हँडसेटवर नो-कॉस्ट ईएमआय ऑफर देखील आहे. 2000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह फोन खरेदी करू शकता.

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 108-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे. फोनमध्ये 2 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स देखील आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाचा डिस्प्ले आहे. स्क्रीन फुलएचडी+ रिझोल्यूशन देते. फोन Android 13.1 आधारित Oxygen OS सह येतो. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटला उर्जा देण्यासाठी, 5000mAh बॅटरी दिली केली गेली आहे जी 67W SuperVOOC चार्ज होते.

  • Samsung Galaxy M14 5G

अॅमेझॉनवर Samsung Galaxy M14 हा स्मार्टफोनचा 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 14,490 रुपयांना खरेदी करू शकता. हा हँडसेट नो-कॉस्ट ईएमआयवर घेता येईल. बँक ऑफरसह, फोनवर 1,750 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा LCD फुलएचडी+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे. स्क्रीनची घनता 401 PPI आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सेल दोन सेन्सर्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी (Video Call) हँडसेटमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये Exynos 1330 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन Android 13 आधारित One UI Core 5.0 सह येतो. हँडसेटला पॉवर करण्यासाठी 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगचे म्हणणे आहे की फोनला 2 अँड्रॉइड अपडेट्स आणि 4 सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.

  • Realme Narzo N55

Realme Narzo N55 हा स्मार्टफोन Amazon वर Rs.10,999 मध्ये लिस्ट झाला आहे. ही किंमत 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजची आहे. फोनवर नो-कॉस्ट ईएमआय आणि बँक ऑफर देखील आहेत.

Narjo 55 स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 33W SuperVOOC चार्जिंग उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की फोन फक्त 29 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो. या Realme फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक रियर कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये 90 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह 6.72 इंच फुलस्क्रीन डिस्प्ले आहे.

  • iQOO Z7s 5G

IQ Z7S 5G हा स्मार्टफोन बँक ऑफर आणि विनाखर्च EMI सह मिळू शकतो. हँडसेट Amazon India वर 19,999 रुपयांना लिस्ट झाला आहे.

iQOO Z7s 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G मोबाइल प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 6.38 इंच फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीनची ब्राइटनेस 1300 nits आहे आणि तिचा रीफ्रेश दर 90 Hz आहे.

स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा आहे. याशिवाय 2 मेगापिक्सलचा बोकेह सेन्सरही आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये 44W FlashCharge सपोर्ट देण्यात आला आहे. ज्याद्वारे बॅटरी केवळ 23 मिनिटे 11 सेकंदात 50 टक्के चार्ज होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT