Relationship Tips | Happy Couple  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips For New Relationship : नव्याने प्रेमात पडला आहात? मग वेळीच जोडीदाराच्या या गोष्टी घ्या जाणून, नाहीतर...

जोडीदार निवडताना काही गोष्टींची काळजी घेणारे लोक भविष्यात कधीच नाराज होत नाहीत.

दैनिक गोमन्तक

आजकाल बहुतेक तरुणांना लव्ह मॅरेज करायचे असते, पण प्रेमविवाह कधीच यशस्वी होत नाही, असे घरच्यांचे टोमणे त्यांना अनेकवेळा ऐकावे लागतात. प्रेमात पडल्यावर लग्न करतात पण नंतर पश्चात्ताप होतो असे अनेक लोकांसोबत घडते. असे घडते कारण तुम्ही तुमच्या जोडीदाराला नीट समजून घेण्यात चूक करता. जोडीदार निवडताना काही गोष्टींची काळजी घेणारे लोक भविष्यात कधीच नाराज होत नाहीत. या गोष्टी तुम्हीही लक्षात ठेवाव्यात. (Tips For New Relationship)

जोडीदार निवडताना या गोष्टींची जरूर माहिती करून घ्या :

  • जे तुमच्याशी खोटे बोलतात

नात्यात तुमच्याशी खोटे बोलणारा जोडीदार असेल तर याचाही विचार करायला हवा. जर जोडीदार तुमच्याशी सतत खोट बोलत असेल आणि पुन्हा पुन्हा तुमचं मन वळवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्हीही अशा लोकांना टाळावे कारण पार्टनरपासून सत्य लपवणे ही चांगली गोष्ट मानली जात नाही.

  • स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवा

एक चांगला जोडीदार तो असतो जो केवळ स्वतःचाच विचार करत नाही तर आपल्या जोडीदाराची आणि कुटुंबाचीही काळजी घेतो. तुमच्या करिअरची, आवडीची काळजी घेणाऱ्याला महत्त्व द्यायला हवे. जर त्याला तुमच्या निवडीची पर्वा नसेल तर तुम्ही स्वतःचा विचार करावा. अशा लोकांपासून अंतर ठेवावे.

  • वचनबद्धतेची काळजी घ्या

रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी, तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की तुमचा जोडीदार वचनबद्धतेबद्दल खरंच खात्रीपूर्वक आहे? बरेच लोक वचनबद्धतेबद्दल अजिबात गंभीर नसतात. ते लोक तुम्हाला सांगू शकतील की भविष्याचा विचार करून वर्तमान का बिघडवायचे, ते आपण नंतर पाहू, असे म्हणणारे लोक तुम्हाला नंतर त्रास देऊ शकतात. जो भविष्याचा विचार करत नाही, तो खरोखरच नात्याबाबत गंभीर असेल याची खात्री नाही.

अशा सर्व गोष्टी तुम्ही नात्यात येण्यापूर्वी जरूर तपासून पाहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT