चिकन टिक्का मसाला हा एक भारतीय पदार्थ आहे, जरी तो बहुतेक पाश्चात्य देशात लोकप्रिय आहे. पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि तंत्र हे सर्व भारतीय पाककृतींमधून आले आहेत. ब्रिटनमध्ये याला लोकप्रिय करण्याचे श्रेय शेफ अली अहमद अस्लम यांना जाते. 2009 मध्ये, ग्लासगो सेंट्रलचे तत्कालीन कामगार खासदार मोहम्मद सरवर यांनी या शहराला चिकन टिक्का मसाल्याचे घर म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्याची मागणी केली होती. पण हा पदार्थ बनला कसा? याची कल्पना शेफला नेमकी सुचली कशी यामागची कहाणी अत्यंत वेगळी आहे.
चिकन टिक्का मसाला रेसिपी शोधण्याचे श्रेय स्कॉटिश शेफ अली अहमद यांना जाते. आज म्हणजेच 22 डिसेंबर रोजी त्यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. तर या रेसिपीमागची कहाणी जाणून घेऊया.
चिकन टिक्का मसाला बनवण्याची कल्पना सुचली कशी?
अली अहमद यांनी 1970 मध्ये पहिल्यांदा चिकन टिक्का मसाला ही रेसिपी बनवली होती. वास्तविक, 1970 मध्ये एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर त्यांना चिकन टिक्का मसाला बनवण्याची कल्पना सुचली. चिकन टिक्का मसाला पहिल्यांदा त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये बनवला गेला जेव्हा एका ग्राहकाने चिकन टिक्का खाताना सॉस ऑर्डर केला आणि चिकन टिक्का खूप कोरडा असल्याचे सांगितले.
चिकन टिक्का कोरडा असल्याची तक्रार ग्राहकाने केल्यावर अली अहमद यांनी दही, मलई आणि मसाल्यांच्या सॉसमध्ये चिकन टिक्का शिजवण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे चिकन टिक्का मसालाचा शोध लागला आणि लवकरच चिकन टिक्का मसाला जगभर प्रसिद्ध झाला. 2009 मध्ये एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अली अहमद यांनी सांगितले की, चिकन टिक्का मसाला ग्राहकांच्या चवीनुसार बनवला जातो. ते म्हणाले की, ग्राहकांना गरम करीसोबत खायला आवडत नाही, म्हणून चिकन टिक्का मसाला हा दही आणि मलईचा सॉस वापरून बनवला जातो.
अली अहमद अस्लम यांचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब भागात झाला. नंतर ते आपल्या कुटुंबासह ग्लासगोला गेले. 1964 मध्ये त्यांनी ग्लासगोच्या पश्चिमेला शीश महाल उघडला. अली अहमद यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ग्लासगो, स्कॉटलंड येथील शीशमहल रेस्टॉरंटने दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.