Diabetes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes: हिवाळ्यात रक्तातील साखरेची पातळी वाढते का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

थंडीच्या दिवसातही दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

Pramod Yadav

Tips For Diabetes Patients In Winter: थंडीच्या दिवसात अनेक शारीरिक समस्या उद्भवतात, त्यापैकी एक म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढते असा अनेकांचा समज आहे. थंड तापमानाचा शरीरावर वाईट परिणाम होतो आणि रक्तातील साखरेची (Diabetes) पातळी वाढते. हिवाळ्यात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. असे 2014 मध्ये नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात सांगण्यात आले होते.

हिवाळ्यात जीवनशैलीतील झालेल्या चुकांमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते. हिवाळ्यात रक्त जास्त घट्ट होते. त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. हिवाळ्यात शरीरातील इन्सुलिनची गरजही कमी होते. या बदलामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते. मधुमेह ही एक दीर्घकालीन आरोग्य स्थिती आहे ज्यामध्ये इतर रोगांचा धोका वाढतो. असे डॉक्टर सांगतात.

हिवाळ्यात साखरेची पातळी नियंत्रित न राहिल्याने मज्जासंस्था, डोळे, किडनी आणि इतर अवयवांवर परिणाम होतो. हिवाळ्यात रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे हात आणि पायांना सूज आणि वेदना देखील जाणवू शकतात. असे तज्ञांचे मत आहे. स्ट्रेस हार्मोनमुळे यकृत अधिक ग्लुकोज सोडते, ज्यामुळे रक्तातील साखरेची (Suger Level In Blood पातळी वाढते.

हिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवायचे?

शरीर उबदार ठेवा

हिवाळ्यात थंड हवेपासून स्वत:चा बचाव करा. थंड हवेच्या संपर्कात आल्याने त्याचा मधुमेहावर परिणाम होऊ शकतो. यासाठी गरम पदार्थांचा आहारात समावेश करा.

फ्लू पासून स्वत:चा बचाव करा

थंडीच्या दिवसात फ्लू किंवा इतर संसर्गापासून स्वत:चा बचाव करा. शरीरातील आजारांमुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते. तसेच, सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्या. शरीराला विश्रांती द्या आणि सकस आहार घ्या.

भरपूर पाणी प्या

तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर साखरेची पातळी वाढू नये म्हणून थंडीच्या दिवसात पाण्याचे अधिकाधिक सेवन करा. पाण्याच्या कमतरतेमुळे लघवीचा स्त्रावही कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. थंडीच्या दिवसातही दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

याशिवाय नेहमी व्यायाम करणे, प्रक्रिया केलेले बाहेरचे पदार्थ न खाणे या गोष्टींची काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT