Diabetes Ayurvedic Treatment : मधुमेह, शुगर किंवा डायबिटीज हा झपाट्याने पसरणारा आणि गंभीर आजार आहे. दुर्दैवाने, मधुमेहावर कायमस्वरूपी कोणताही उपचार नाही. पण त्यावर नियंत्रण ठेवल्यास आपण सामान्य जीवन जगू शकता. निरोगी आहार आणि मध्यम व्यायामाचे पालन केल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो मधुमेहामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते ज्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. रक्तातील साखरेच्या वाढीमुळे जास्त तहान लागणे, जास्त लघवी होणे, अंधुक दिसणे, वजन कमी होणे अशा अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धती वापरू शकता. मधुमेहावर आयुर्वेदिक उपचार काय आहे? हे आपण पाहू.. काही गोष्टींचं पालन केल्यास तुम्ही काही दिवसांत रक्तातील साखरेची पातळी कमी शकता.
सुस्त जीवनशैलीपासून दूर राहा-
मधुमेही रुग्णांनी दररोज ४० मिनिटे हालचाल (चालणे, सायकल चालवणे, कार्डिओ आणि योग) आणि २० मिनिटे दीर्घ श्वास घेणे (प्राणायाम) करणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला मधुमेह रोखायचा असेल तर अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया (blood circulation) सुरळीत राहून शरीरातील प्रत्येक पेशीला पुरेसा ऑक्सिजन, लिव्हर डिटॉक्स होणं आणि इन्सुलिनचा योग्य स्राव होण्यास मदत होते.
रात्रीचं जेवण लवकर घ्या-
रात्रीचे जेवण लवकर घेणे हा तुमची रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा सर्वात सोपा व हेल्दी मार्ग आहे. शक्य असल्यास, सूर्यास्तापूर्वीच रात्रीचे जेवण करून घ्या. रात्रीचे जेवण रात्री 8 च्या आधी घेणे कधीही चांगले.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका-
हाय ब्लड शुगर असलेल्या लोकांना दिवसा झोपण्यास सक्त मनाई आहे. दिवसा झोपेमुळे शरीरातील कफ दोष वाढतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
मानसिक ताणतणाव न घेणे –
जितकं आहारकडे लक्ष देणं आवश्यक असत तितकंच आपले मानसिक आरोग्य सुस्थितीत कसे राहील याकडेही लक्ष देणं आवश्यक असते. चिंता, भीती, ताणतणाव, अतिविचार मनात बाळगू नयेत. मन जितक शांत आणि समाधानी तितकी आपली रोगप्रतिकरक शक्ति वाढते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.