Throning Dating Meaning Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Throning Dating: हे प्रेम नव्हे, पद किंवा पैसा आहे! कोणीतरी तुमच्यासोबत थ्रोनिंग रिलेशनशिपमध्ये नाहीये ना?

Throning Dating Meaning: गोल्ड डिगिंगच्या संकल्पनेतूनच थ्रोनिंग रिलेशनशिपची सुरुवात झाली.. पण याचा अर्थ काय? आणि आपण एखाद्या थ्रोनिंग रिलेशनशिपमध्ये नाही आहोत ना हे कसा ओळखावं?

Akshata Chhatre

Throning Dating Meaning in Marathi

आपण आजकाल अशा जगात वावरतोय जिथे माणसाने कमावलेले पैसे आणि त्याचं समाजातील स्थान हे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्वाचं ठरतं. Genz मध्ये गोल्ड डिंगिंगची संकल्पना बरीच प्रचलित होतेय, याचा अर्थ काय तर एखाद्या माणसाजवळ असलेली संपत्ती स्वतःच्या नावे करून घेण्यासाठी किंवा संपत्तीचा फायदा मिळवण्यासाठी त्या व्यक्तीसोबत राहायचं, प्रेमाने वागायचं आणि काम झाल्यानंतर निघून जायचं.

वाचायला, ऐकायला खूप क्रूरपणा वाटतोय ना? पण आपली मानसिकताच एवढी बदलतेय की आपण अशा चुकीच्या गोष्टींना सुद्धा खतपाणी घालू लागलोय. या गोल्ड डिगिंगच्या संकल्पनेतूनच थ्रोनिंग रिलेशनशिपची सुरुवात झाली.. पण याचा अर्थ काय? आणि आपण एखाद्या थ्रोनिंग रिलेशनशिपमध्ये नाही आहोत ना?

इंग्रजीमध्ये थ्रोन याचा अर्थ सिंहासन असा होतो, पण याचा शाब्दिक अर्थ न घेता मूळ अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. राजा जेव्हा सिंहासनावर बसतो तेव्हा त्याच्याजवळ श्रीमंती असते, बळ असतं आणि याच्या जोरावर राजा काहीही करूच शकतो.

आपल्या आजूबाजूला देखील अशी माणसं असतात, हो ना? त्याच्याजवळ अफाट संपत्ती असते, लोकं त्यांचा मानसन्मान करतात आणि एकूणच त्याच्या फक्त सोबत असण्याने आपलं देखील वर्चस्व राहतं. आत्ताच्या घडीला समाजात यालाच थ्रोनिंग रिलेशनशिप असं म्हटलं जातंय.

एखादा मुलगा किंवा मुलगी त्याच्या पार्टनर सोबत प्रेम आहे म्हणून नाही तर त्या व्यक्तीसोबत राहिल्याने समाजात आपला वचक वाढेल म्हणून राहत असतो. थ्रोनिंग रिलेशनशिपमध्ये अनेकवेळा माणसाचे गुण, त्याचा स्वभाव यांना फारसं महत्व दिलं जात नाही, याउलट किती लोकं त्या माणसाचे पाय धरून आहेत, किती लोकांसाठी तो डॉन आहे आणि त्याच्यासोबत असल्याने मला काय फायदा होईल यावार फोकस केला जातो.

स्वभावापेक्षा स्टेटसला महत्त्व का दिले जाते? (What is Throning Dating?)

Genz मुलामुलींना सोशल मीडिया फार महत्वाचा वाटतोय. सोशल मीडियावर मी किती मोठा आहे, सुंदर आहे, माझ्याजवळ किती पैसे आहेत हे दाखवण्याच्या आटोकाट प्रयत्न केला जातो आणि या दिखावेगिरीच्या नादात थ्रोनिंग रिलेशनशिपची मदत घेतली जाते.

मुळात या नात्याला प्रेमाची किंवा समजूतदारपणाची गरज नसतेच, या व्यक्तींना हवी असते ती ओळख आणि त्या ओळखीसोबत येणारा रुबाब. पण अशी नाती अधिककाळ तग धरूच शकत नाहीत कारण आपण ज्या व्यक्तीसोबत आहोत ती आपल्यासाठी योग्य आहे ना? या प्रश्नाचं उत्तरंच मुळात आपल्याजवळ नसतं. काहीकाळानंतर आपला अहंकार विरून जातो आणि सोबत ते नातं सुद्धा.

थ्रॉनिंग रिलेशनशिपचे धोके काय आहेत ? (Why Throning Dating is Harmful?)

थ्रोनिंग रिलेशनशिपमध्ये काहीकाळासाठी तुम्ही सुख अनुभवाल, सारं जग तुमच्या पायाशी येऊन पडलंय असं वाटेल, हवेत जगत असाल पण लक्षात घा या नात्याला काही बेज नाहीये, हा काहीवेळासाठी बांधलेला एक पत्त्यांचा मनोरा आहे जो एका हवेच्या झोक्याने सुद्धा कोलमडून पडेल.

याउलट काय कराल? स्वतः वर मेहनत घ्यायला सुरुवात करा. कोणी दुसऱ्या माणसाने आपल्याला ओळख द्यावी अशी परिस्थिती निर्माण करू नका, प्रत्येक माणूस हा काही विशेष गुण घेऊन आलेला असतो, त्यामुळे तुमच्यातलं विशेषपण शोधा आणि त्याला खतपाणी द्या.

नातं हे प्रेम आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभं असतं त्यामुळे पार्टनर किती पैसे कमावतोय, त्याचा सोशल स्टेटस काय आहे आणि यामुळे मी कसा मोठेपणा मिरवू शकेन याला प्राधान्य न ठेवता इतर महत्वाच्या गोष्टींवर भर द्या.शेवटी एक कायम लक्षात ठेवा की आपण स्वतः जर का संपन्न असू तर नक्कीच समोरचा माणूस देखील तेवढ्याच दर्जाचा सापडतो.

थ्रोनिंग रिलेशनशिपची लक्षणे कोणती? (Characteristics of Throning Relationship)

१) तुमचा पार्टनर सोशल स्टेटस वाढवण्यासाठी तुमचे गोडवे गातोय, खरोखर मनापासून एखादी गोष्ट करायची असल्यास ते नसतात.

२) तुमचा पार्टनर इतरसांसमोर तुमचं नाव घेऊन मोठेपणा गाजवतोय.

३) तुमचा पार्टनर गाडी,पैसे, मोठेपणा याबद्दल चर्चा करतो, याशिवाय आवश्यक गोष्टी त्याचा फोकस नाहीये .

४) तुमचा पार्टनर तुमचं नाव वापरतोय.

५) तुमचा पार्टनर गरजेच्यावेळी तुमच्यासाठी उपलब्ध नसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT