Gemology Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gemology: जीवनसाथीसोबत नातं होईल घट्ट, लक्ष्मीचाही राहील आशिर्वाद

ज्योतिषशास्त्रानुसार कोणते रत्न घालावे हे जाणून घेउया.

दैनिक गोमन्तक

ज्योतिषशानुसार ग्रहांचे प्रत्येक राशींवर काहीना काही शुभ प्रभाव असतात. तसेच अशुभ प्रभावही असतात. या अशुभ प्रभावापासून दिलासा मिळावा यासाठी ज्योतिषी वेगवेगळ्या राशीच्या व्यक्तींना वेगवेगळी रत्न धारण करण्याचा सल्ला देतात. ही रत्न त्या त्या राशीच्या व्यक्तींना ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून दिलासा देतात.

ज्योतिष शास्त्रात नवरत्नांचे वर्णन करण्यात आले आहे. अनेकदा आपल्याला ती रत्न खिशाला परवडणारी नसतात. मग त्यासाठी उपरत्न जी तुलनेत काहीशी कमी किमतीची असतात अशी उपरत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. आज वृषभ, तूळ, कुंभ आणि मकर राशीसाठी कोणते रत्न फायदेशीर ठरु शकते याची माहिती आपण घेणार आहोत.

वृषभ, तूळ, कुंभ आणि मकर या राशींसाठी ओपल हे रत्न धारण करण्याचा सल्ला ज्योतिषांकडून दिला जातो. ओपल या रत्नाचा थेट संबंध शुक्र या ग्रहाशी आहे. शुक्राला संपत्ती आणि समृद्धी देणारा ग्रह म्हणून मानलं जातं. त्यामुळेच या राशीच्या व्यक्तींनी ओपल रत्न धारण केल्यास त्यांची आर्थिकदृष्ट्या भरभराट होते असं सांगितलं जातं.

  • कोणी परिधान करावं ओपल रत्न

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ, तूळ, कुंभ आणि मकर राशीचे लोक ओपल स्टोन घालू शकतात. दुसरीकडे, चित्रपट, फॅशन डिझायनिंग, कला आणि मीडिया क्षेत्राशी संबंधित लोक देखील ते परिधान करू शकतात. यासोबतच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र ग्रह सकारात्मक म्हणजेच शुभ असेल त्यांनी ओपल स्टोन घातला जाऊ शकतो.

  • कोणत्या रत्नासोबत ओपल घालू नये

ओपल रत्नासोबत माणिक, मोती आणि कोरल ही रत्ने घालणं टाळावं असा सल्ला ज्योतिषी देतात.

  • काय आहेत ओपल रत्नाचे फायदे

भाग्य वाढते. वैवाहिक जीवनात गोडवा येतो. पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होत असेल तर ओपल स्टोन धारण करणे फायदेशीर ठरते.हिरा महाग असल्याने ज्यांना हिरा घालता येत नाही. त्यामुळे ते लोक ओपल देखील घालू शकतात.

  • कसं धारण करावं ओपल

ओपल शुक्रवारी परिधान केले जाऊ शकते. ओपल चांदीच्या धातूमध्ये परिधान केले जाऊ शकते. ओपल धारण करण्यापूर्वी कच्च्या गाईचे दूध आणि गंगाजलाने अंगठी शुद्ध करा. त्यानंतर तुम्ही हे रत्न परिधान करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

SCROLL FOR NEXT