Coconut Tree Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Food Culture: तुम्हाला माहित आहे का? गोव्याच्या स्वयंपाकातील नारळाचे हे आहेत आश्‍चर्य कारक फायदे!

Goa Food Culture: नारळातील ही पोषकतत्वे आपल्या आरोग्याला समृध्द बनवते.

Shreya Dewalkar

Goa Food Culture: गोमंतकीय लोकांच्या खाद्यान्‍नसंस्कृतीत नारळाचे विविध पदार्थ केले जातात. गोमंतकीय लोकांचा स्वयंपाक देखील नारळा शिवाय तयार होऊ शकत नाही. गोव्यात मुबलक प्रमाणात नारळाची झाडे आपल्याला पहायला मिळतात. त्यामुळे गोव्यातील माड हे पर्यटनाचा आकर्षकबिंदू ही ठरत आहे. नारळातील ही पोषकतत्वे आपल्या आरोग्याला समृध्द बनवते.

पोषक घटक:

नारळातून व्हिटॅमिन सी, बी-जीवनसत्त्वे तसेच खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससह यासारखी शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आपल्याला मिळतात.

हेल्दी फॅटस- नारळात मध्यम-साखळी ट्रायग्लिसेराइड्स (एमसीटी) हे ट्रायग्लिसेराइड्स ही हेल्दी फॅटस असतात. जे त्वरीत मेटॉबॉयलिज केले जाऊ शकतात. व आवश्‍यक प्रथिने, कार्बोहायड्रेडटस शरीराला मिळतात.

वजनावर नियंत्रण- आहारातील नारळात फायबर असते. हा घटक पचण्यास सुलभ असतो. तसेच वजनावर नियंत्रण ठेवायला मदत करतो.

ताणतणावापासून दूर ठेवते- नारळातील ॲंटिऑक्साईडस घटक हे आपल्याला ताणतणावापासून दूर ठेवतात त्याचप्रमाणे

ॲसिडिटीवर नियंत्रण: शरीरात ॲसिडिटी कमी करण्यास प्रतिबंध करते.

नारळाचे तेल: हे मॉईश्‍चरायझिंगमुळे त्वचा तजेलदार बनते. रोज अंघोळीच्या आधी नारळतेलाने मसाज करण्याचा सल्ला आर्युवेदिक डॉक्टर देतात. केसांना कोमट करून नारळाचे तेल लावल्यास केस चमकदार व वाढतात.

हायड्रेशन: नारळ पाणी एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट ड्रिंक आहे. त्यामुळे गरोदरपणात पाण्याची आवश्‍यकता असते त्यामुळे हमखासपणे हे पिण्याचा डॉक्टर सल्ला देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT