'हे' आहेत मखानाचे Side Effect Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'हे' आहेत मखानाचे Side Effect

जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

मखाना हे आरोग्यासाठी लाभदायी आहे. मखानाचे (Makhana) सेवन केल्याने ह्रदयाचे (Heart) आरोग्य चांगले राहते. मखानामुळे अशक्तपना (Weakness) कमी होण्यास मदत मिळते. तसेच हाडांचे (Bones) आरोग्यसुद्धा मजबूत होते. मखानामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह , फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. अनेक लोक मखानाचे फायदे वाचून त्याचे अतिसेवन करतात. मखानाच्या अतिसेवणामुळे आपल्या (Health) आरोग्यास धोका (Side Effect) निर्माण होऊ शकतो. जर तुम्हीसुद्धा मखणाचे (Makhana) अतिसेवन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

* पचनशक्ती कमकुवत होऊ शकते

आपण मूठभर स्नॅक्सच्या स्वरूपात पौष्टिक घटकांनी समृद्ध मखानाचे (Makhana) सेवन करू शकता. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. मखनाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि सूज येऊ शकते.

* शरीरातील उष्णता वाढते

मखाना (Makhana) हा उष्ण पदार्थ आहे. याचे अति सेवन केळल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. यामुळे आरोग्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे मखानाचे अतिसेवण करणे टाळावे.

* गर्भवती महिलांनी खाणे टाळावे

गर्भअवस्थेत असताना महिलांनी मखानाचे (Makhana) सेवन करू नये. मखानाचे सेवन केल्याने नवजात बाळाला धोका निर्माण होऊ शकते.

* अॅलर्जी होऊ शकते

मखानामध्ये (Makhana) स्टार्चचे प्रमाण भरपूर असते. मखानाचे अतिसेवन केल्याने आपल्या शरीरात स्टार्चचे प्रमाण वाढू शकते. यामुळे अॅलर्जी वाढण्यास कारणीभूत ठरते. ज्या लोकाना आधीच अॅलर्जी आहे त्या लोकांनी मखानाचे सेवन करणे टाळावे.

* ताप वाढू शकते

तुम्हाला जर ताप, सर्दी किंवा डायरिया असेल तर मखानाचे (Makhana) सेवन करणे टाळावे. कारण मखानाच्या सेवन केल्याने या आजारांमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे अशा लोकांनी मखाना खाणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT