जागतिक हृदय दिनाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

जागतिक हृदय दिन: काळीज घट दवर!

दैनिक गोमन्तक

'काळीज घट दवर!’ अशा तऱ्हेच्या वाक्याने गोवेकर एकमेकांना नेहमीच आश्‍वस्त करत असतात. अर्थात ह्या ‘काळीज घट दवर’चा अन्वयार्थ वेगळा असला तरी ‘काळीज’ (Heart) ही आजच्या धकाधकीच्या काळात काळजीपूर्वक निगा राखायचीच बाब बनली आहे.

‘हदय’ (Heart) कमकुवत होण्यासारख्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला सातत्याने घडताहेत, पण ‘हदय’ ही अगदी वैयक्तिक बाब असल्याकारणाने आपण या सभोवतालच्या घडामोडींकडे व्यक्तिशः कसे पाहतो आणि स्वतःला निर्लेप राखून त्या कशा हाताळतो हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘काळीज घट’ राखणे ही साऱ्या संघर्षातून आपल्याला तारून नेणारी आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. आज ‘जागतिक हृदय दिन!’ (World Heart Day) हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहार आरोग्यकारक असावा, नेहमी सक्रिय असावे, धूम्रपान टाळावे, कॉलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियमित असावा, मद्यपान माफक असावे, मानसिक ताणाचे व्यवस्थापन नीट व्हावे वगैरे उपाय आपल्या नजरेत आज ठळकपणे येतीलच.

ही आचारशैली महत्त्वाची आहेच, पण हृदयाने विशाल व्हावे, अंतरात साचलेल्या साऱ्या विकारांना विसरून मस्त व्हावे हा हृदयरोगांवरचा सर्वात महत्त्वाचा प्रथोमापचार आहे. साधारण 18 दशलक्ष लोक दरवर्षी हृदयरोगाचे शिकार ठरतात. ‘हृदय दिन’ आपण सर्वांना ही गंभीर बाब विदीत करतो आणि उत्तम ‘हृदया’ने जीवन जगण्यासाठी प्रेरीतही करतो. ‘हृदयाचे आरोग्य हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे, जागतिक आरोग्याची ती गुरुकिल्ली आहे असा संदेशही देतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कुरिअरद्वारे गोव्यातून मागवली विदेशी दारु, स्कॉर्पिओमधून पार्सल घ्यायला आले अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भाडेकरु ठेवणाऱ्या गोमन्तकीयांसाठी अतिशय महत्वाची बातमी, Police Verification न केल्यास भरावा लागणार 10 हजार दंड

Pakistan Economic Crisis: एका झटक्यात 1.5 लाख सरकारी नोकऱ्या गेल्या, पाकिस्तानने का घेतला इतका मोठा निर्णय?

Goa Crime: साताऱ्यातील तरुणाने गोव्यातल्या युवतीला घातला 19 लाखांचा गंडा, पोलिसांना आवळल्या मुसक्या

गोव्यात 'कायदा सुव्यवस्था' राखण्यासाठी पोलिसांची दिवस-रात्र मेहनत; वाळपई, शिवोलीत 'पडताळणी मोहिम'

SCROLL FOR NEXT