Tea |Summer  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात चहाचा एक कप ठरेल आरोग्यदायी

Tea Benefits In Summers: उन्हाळ्यात चहा पिल्याने आरोग्य निरोगी राहू शकते

दैनिक गोमन्तक

चहा प्रेमींसाठी हिवाळा असो किंवा उन्हाळा, कोणताही ऋतू त्यांना चहा पिल्याशिवाय राहू शकत नाही. ताणतणावापासून ते प्रत्येक लहान-सहान आनंदात त्या लोकांना चहा प्यावासा वाटतो. काही लोक म्हणतात की उन्हाळ्यात जास्त चहा पिऊ नये. हे काही प्रमाणात खरेही आहे. जसे आपण सर्व जाणतो की प्रत्येक गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी वाईट ठरू शकतो. कोणत्याही आरोग्यदायी (Health) गोष्टीचे अतिसेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतो. पण रोज एक कप चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (Tea Benefits in Summers News)

* एक कप चहा पिण्याचे फायदे

चहामध्ये पॉलीफेनॉल, कॅटेचिन आणि फ्लेव्होनॉइड्ससह शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. चहा पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातील पॉलीफेनॉल व्हिटॅमिन डी ची पातळी वाढवते. हाडांचे खनिजीकरण (bone mineralization) करते, ज्यामुळे अनेक रोग उद्भवतात. बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असते आणि चहा प्यायल्याने ही कमतरता कमी होऊ शकते. चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि इस्ट्रोजेनसारखे गुणधर्म असू शकतात, जे हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.


* कोणत्या प्रकारचा चहा फायदेशीर आहे
संशोधकांचे मत आहे की ओलोंग, ब्लॅक आणि ग्रीन टी हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की '50-60 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चहा पिणे प्रभावी आहे. कारण ते कॅटेचिन टिकवून ठेवण्यास मदत करते, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते'. या व्यतिरिक्त, संशोधनानुसार, गरम चहाऐवजी आईस टी पित असाल तरी फायदेशीर ठरते.

फायटोमेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ग्रीन टी (Green Tea) पिण्याने स्मरणशक्ती (Memory) सुधारते आणि मन शांत राहते. चहामध्ये असलेले कॅटेचिन्स, कॅफिन आणि एल-थेनाइन हे भरपूर पौष्टिक असतात. हे मेंदूला चालना देण्यासाठी देखील प्रभावी आहे. याशिवाय सकाळी एक कप चहा प्यायल्याने आळस दूर होतो आणि तुमच्या दिवसाची सुरुवात फ्रेश होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT