Tattoo New Fasion Trend Dainik Gomantak
लाइफस्टाइल

टॅटूचे हे धोके तुम्हाला माहित आहेत का?

लोकांना टॅटूचे इतके वेड आहे की त्यांच्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या रंगाचा वापर करून नमुने आणि डिझाईन्स वापरतात, तथापि,आपण कधी विचार केला आहे का या फॅशनेबल ट्रेंडच्या पलीकडे काय आहे?

दैनिक गोमन्तक

टॅटू (Tatoo) काढणे हा आजकाल फॅशनट्रेंड (fasion Trend) झाला आहे. अधिकाधिक लोक त्यांच्या शरीरावर टॅटू बनवतात. पूर्वी लोक त्यांना हातावर किंवा मानेवर टॅटू करण्यासाठी प्राधान्य देत होते पण आज शरीराच्या कोणत्याही भागावर (Any part Of body) टॅटू काढला जातो. तथापि, लोकांना टॅटूचे इतके वेड आहे की त्यांच्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या रंगाचा वापर करून नमुने आणि डिझाईन्स वापरतात, तथापि,आपण कधी विचार केला आहे का या फॅशनेबल ट्रेंडच्या पलीकडे काय आहे?

Tattoo New Fasion Trend

टॅटू काढण्यामुळे तुम्हाला त्वचे संबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते याची तुम्हाला कल्पना आहे का, आजकाल फॅन्सी टॅटू साठी केमिकल रंगांचा वापर केला जातो या केमिकल मुळे तुम्हाला त्वचेच्या संबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पूर्वी गोंदण म्हणून ओळख असणाऱ्या या टॅटू चा आता नवीन फॅशन ट्रेंड आला आहे

टॅटूचे तोटे काय आहेत?

  • टॅटू हा पर्मनंट आहे

    तुम्ही आत्ता तुमच्या शरीरावर जो टॅटू काढत आहात तो भविष्यात तुम्हाला आवडेल याची खात्री आहे; ठराविक दिवसानंतर तुम्हाला त्याचा कंटाळा येऊ शकतो आणि तेव्हा तुमच्या शारीवरून हा टॅटू हटवणे अवघड होऊ शकते

  • टॅटू धोकादायक आहे

    आपण कुशल व्यक्तीकडून टॅटू करून घ्यावा,नामांकित पार्लरमध्ये टॅटू करून घेणं हे काहीवेळा धोकादायक ठरू शकत. टॅटू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेचा अभ्यास करण गरजेचं असत कारण काही लोकांना शाईची अ‍ॅलर्जी असते, तर काहींना हिपॅटायटीससारखा संसर्ग होऊ शकतो कारण काहीवेळा संक्रमित सुया किंवा कमी किमतीची उपकरणे वापरली जातात. आणि हे धोकादायक ठरू शकते.

  • तुम्ही रक्तदान करू शकत नाही

    काही राज्यांमध्ये तुम्ही तुमच्या शरीरावर टॅटू काढल्यानंतर किमान एक वर्ष रक्तदान करू शकत नाही. आपले राज्य नियम काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे, कारण सर्व राज्यांचे नियम एकसमान नसतात.

Tattoo New Fasion Trend
  • कामाच्या ठिकाणी टॅटूचे अनेक तोटे आहेत

    व्यवसायांमध्ये एखाद्या व्यक्तीचे शारीरिक स्वरूप खूप महत्वाचे आहे, प्रोफेशनल ठिकाणी टॅटूला कमी महत्व आहे; टॅटू मुळे तुमच्या उद्योगांमधील करिअरच्या संधी नष्ट होऊ शकतात, तसेच तुम्हाला नेव्ही, आर्मी, पोलीस या सारख्या शाखांमध्ये मध्ये असणाऱ्या नोकरीच्या संधी तुम्ही गमावू शकता

  • टॅटू वेदनादायक आहे

    टॅटूचा आकार जितका मोठा असेल तितका वेदना जास्त असेल. टॅटू गनमध्ये शाईने भरलेल्या सुयांचा गुच्छ असतो. तीक्ष्ण सुया तुमच्या त्वचेच्या थरातून टोचलय जातात आणि हा अतिशय वेदना दायक प्रकार आहे.

  • टॅटूच्या शाईमुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते

    टॅटू काढताना वापरण्यात येणाऱ्या सुयाचा वापर करून तुमच्या त्वचेच्या पृष्ठभागावर लहान छिद्रे पडली जातात, या मुळे घातक बॅक्टिरिया सहज तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि या मुळे तुम्हाला त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते

  • संक्रमण होऊ शकते

    तुम्ही योग्यठिकाणी जाऊन टॅटू काढणे अत्यंत गरजेचे आहे, टॅटू काढताना सेफटी अत्यंत महत्वाची आहे कारण एकमेकांच्या सुया वापरल्याने तुम्ही गंभीर आजाराने संक्रमित होऊ शकता

टॅटू बनवण्याची वेगवेगळी कारणे आहेत; काही जण टॅटू माधून त्यांच्या आवडत्या आठवणी जपतात, तर काही शरीरावरील डाग लपवतात, तर काहींसाठी ती स्टाईल आहे. टॅटू कलाकारांची संख्या अमेरिकेत 2021 पर्यंत वाढून 25,843 झाली आहे, 2020 पासून 3.6% वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT