Relief From Swelling Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Swelling Feet Home Remedies: पायांवर आलेल्यावर सुजेपासून एका झटक्यात मिळवा सुटका

तुमच्याही पायावर सुज येत असेल तर तुम्ही पुढील उपाय करू शकता.

Puja Bonkile

Swelling Feet Home Remedies: अनेक कारणांमुळे पायांना सूज आणि वेदना होऊ शकतात. परंतु सामान्यतः शरीरात पोषक नसणे, बराच वेळ उभे राहणे, मोच येणे, यामुळे होतो. 

शरीरातील पौष्टिकतेची कमतरता आणि खाण्यामध्ये निष्काळजीपणा ही पायांना सूज येण्याची प्रमुख कारणे आहेत. किडनी, हृदय आणि यकृत यासारख्या गंभीर आजारांसारख्या इतर अनेक आजारांमुळेही पायांवर सूज येते. काही घरगुती उपाय वापरून तुम्ही सुज कमी करू शकता.

'या' घरगुती टिप्सचे अनुसरण करा

पायाची सूज दूर करण्यासाठी लसूणच्या 2-3 पाकळ्या घ्या आणि त्या ऑलिव्ह ऑईलमध्ये चांगल्या प्रकारे शिजवा. या तेलाने दिवसातून तीन वेळा चांगले मसाज करावा. हळूहळू सूज कमी होऊ लागेल. 

आंघोळीनंतर मोहरीचे तेल थोडे गरम करून त्या तेलाने पायाला मसाज करावी. 

अर्धा किलो बटाटे एका ग्लास पाण्यात उकळावे. त्यानंतर या पाण्याने पाय धुवावे. 

जर सूज खूप वाढली असेल तर दिवसातून दोनदा आल्याच्या तेलाने बोटांना मसाज करा, यामुळे लगेच आराम मिळेल. 

एक बादली गरम पाण्यात सफरचंद सायडर व्हिनेगर मिक्स करावे. त्यानंतर या पाण्यात एक टॉवेल भिजवून पायाच्या बोटांवर ठेवा. 

अर्धा कप पाण्यात एक चमचा अख्खी कोथिंबीर भिजवा आणि नंतर पेस्ट पायाला लावा. यामुळे तात्काळ आरामही मिळतो. 

गरम पाण्यात रॉक मीठ टाकावे आणि त्यात रोज पाय टाकून बसावे. यामुळे सूज कमी होईल. 

तांदळाच्या पिठात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा आणि नंतर ही पेस्ट पायाला लावा. यामुळे सूज येण्यापासून आराम मिळेल. 

अर्धी बादली गरम पाण्यात निलगिरी, पेपरमिंट आणि लिंबूचे आवश्यक तेलाचे तीन ते चार थेंब मिसळा, त्यानंतर तुमचे पाय त्यात 15 मिनिटे ठेवा. 

4 ते 5 बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळा आणि सूजलेल्या भागावर लावा. यामुळे तात्काळ आराम मिळेल. 

एक चमचा खोबरेल तेलात दोन चमचे हळद मिसळून पेस्ट बनवा. नंतर पायाला लावा. यामुळे सूज लगेच कमी होईल. 

  • या गोष्टींची विशेष काळजी घ्या

पायावर सूज वाढली असेल तर जंक फूड खाऊ नका तसेच प्रिझर्वेटिव्ह पदार्थ खाणे टाळावे.

सफरचंद, केळी, गाजर, बीटरूट, ब्रोकोली, स्प्राउट्स, मूग डाळ, मटार, राजमा, हरभरा, बार्ली, बदाम, चिया बिया यांसारखे पौष्टिक आणि फायबरयुक्त पदार्थ खावे.

मीठ आणि साखर कमी खावे.

रोज बीटरूट खा, सूज कमी होते.

भरपूर पाणी प्यावे.

पाय लटकत बसू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi in India: मेस्सी आला अन् मैदानात तूफान राडा, चाहत्यांनी पाण्याच्या बाटल्या आणि खुर्च्या फेकल्या Watch Video

'कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते देव वाटत असले तरी सरकारवरील टीका रोखण्यासाठी कायद्याचा वापर करता येत नाही'; म्हापसा कोर्ट

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्री झाले न्यायाधीश!

Radical Prostatectomy: डॉ. केदार्स मॅटर्निटीमध्‍ये 'रॅडिकल प्रोस्टेटक्टॉमी' यशस्वी, कर्करोग उपचारात मोठे पाऊल; डॉ. शर्मद कुडचडकर यांची कामगिरी

टीम इंडियाच्या पराभवानंतर 'हाय-व्होल्टेज ड्रामा'! हार्दिक-गौतमच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल Watch Video

SCROLL FOR NEXT