Swasthyam 2022 | Dr Kumar Vishwas | Swasthyam Event Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Swasthyam 2022 : प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास करणार सकाळ स्वास्थ्यमचं उद्घाटन

Dr Kumar Vishwas : प्रख्यात कवी आणि खुमासदार वक्ते म्हणून देशभर ओळख असलेल्या डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्‍घाटन येत्या शुक्रवारी (ता. 9) होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Swasthyam Event 2022 : प्रेम, नाते-संबंध, समाजकारण- राजकारणाच्या सद्यःस्थितीवर कवितांच्या माध्यमातून नेमके बोट ठेवणारे आणि युवकांमध्ये कमालीचे लोकप्रिय असलेले प्रख्यात कवी आणि खुमासदार वक्ते म्हणून देशभर ओळख असलेल्या डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्‍घाटन येत्या शुक्रवारी (ता. 9) होणार आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Swasthyam 2022)

त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन नागरिकांना मिळणार आहे.
‘सोहळा स्वास्थ्याचा, जागर आरोग्याचा’ या उपक्रमातून आनंदी जीवनाचे धडे नागरिकांना सलग तीन दिवस (9, 10 आणि 11 डिसेंबर) मिळणार आहे. ‘सकाळ स्वास्थ्यम’च्या उद्‍घाटनाचा सोहळा शुक्रवारी (ता.9) सायंकाळी सहा वाजता स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाल्यावर ‘दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी रामायण आणि महाभारतातील शिकवण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. (Swasthyam Wellness)

‘कोई दिवाना कहता है’, ‘हुनर बोलते है’, ‘जवानी में कई गझलें’, ‘तुम अपना कहती थी’ या डॉ. विश्वास यांच्या कविता प्रचंड गाजल्या असून सोशल मीडियावर त्यांना लाखो फॉलोअर्स आहेत. ‘रो लिए तुम बिन’ या त्यांच्या कवितेला तब्बल 54 लाख नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ असून आबालवृद्धांचीही त्यांना पसंती आहे.

समाजकारण, राजकारण या विषयावरही डॉ. विश्वास यांची खुमासदार व अनोख्या शैलीतील फटकेबाजी देशातील विविध शहरांतील नागरिकांना भावली आहे. राजकीय नेते म्हणूनही परिचित असलेले डॉ. कुमार विश्वास गुजरात निवडणुकीच्या धामधुमीतून खास वेळ काढून ‘सकाळ स्वास्थ्यम’च्या उदघाटनासाठी पुण्यात येत आहेत. त्या प्रसंगी त्यांचे होणारे व्याख्यान हे पुणेकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ (Swasthyam) या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

https://www.globalswasthyam.com/

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT