Sun Rays Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Sun Rays Benefits: आजपासूनच सुरु करा सूर्य ध्यान, वाचा याचे फायदे

सूर्याप्रमाणे तेज यावे, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी सूर्य ध्यान आवश्यक ठरते.

Ganeshprasad Gogate

सूर्य म्हणजे अलौकिक तेजाचे प्रतीक. अंधकार दूर करून मानवाला प्रकाशाकडे नेणारा परमेश्वर. अशा या तेजस्वी सूर्याचे ध्यान आणि उपासना प्राचीन काळापासून अतिशय महत्त्वाची मानली जाते. प्राचीन काळातील महान ऋषीमुनींना सूर्यप्रकाशाचे महत्व जेवढे कळाले होते की, त्यांनी लिहिलेल्या अनेक प्राचीन ग्रंथात याचे वारंवार उल्लेख आढळतात. सूर्याप्रमाणे तेज यावे, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी सूर्य ध्यान आवश्यक ठरते. प्राचीन काळापासून सूर्याची प्रार्थना करून ध्यान करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे अनेक उल्लेखही आढळतात.

सूर्य ध्यानाची उपयुक्तता-

सूर्य ध्यानाची उपयुक्तता वर्णन करता येण्यापलीकडची आहे. योग, साधना, अध्यात्म बरोबरच विज्ञानाच्या विविध क्षेत्रातही सूर्याला महत्त्व असल्याचे दिसून येते. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला अनेक घटकांची आवश्यकता असते. याचे महत्त्व आपण जाणतोच पण त्यासाठी सूर्य हा घटकही खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात येत नाही. सूर्य ध्यान करून सकाळची कोवळी किरणे अंगावर घेतल्याने शरीरात प्रक्रिया सुरू होऊन 'ड' जीवनसत्व तयार होते. त्याचप्रमाणे हृदयविकार, त्वचा विकार, रक्तदोष इत्यादींसाठी सूर्यकिरणे फायदेशीर ठरतात. जगातील अनेक नामांकित डॉक्टर्स रक्तक्षय पीडित रुग्णांना सूर्यकिरण स्नानाची खास शिफारत करीत असतात. सूर्यकिरण शरीराला उष्णता देतात. घाम आणून शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकून चांगले आरोग्य प्रदान करतात. हाडाची मजबुती सूर्यप्रकाशावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते हे वैज्ञानिक सत्य आहे. मांसपेशी मजबूत होण्यास आणि शरीराची त्वचा नितळ, तरतरीत होण्यासाठी सकाळची कोवळी सूर्यकिरणे खूपच फायदेशीर ठरतात.

सूर्य ध्यान कसे करावे-

सूर्य ध्यान करावयाचे म्हटले कि ते केव्हा करावे, किती वेळा करावे, कसे करावे, त्याच्या पद्धती कोणत्या असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. अर्थात याची ठराविक उत्तरे अशी देता येणार नाहीत. सूर्य ध्यानाच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे 'सूर्य तेजाची आराधना करून चित्त एकाग्र करून मन शांत करणे, दृष्टीचे तेज वाढवून मनोबल विकसित करणे.'

सूर्य ध्यान करते वेळी शक्यतो सुचिर्भूतपणा अंगी बाळगावा. सूर्योदयापूर्वी एक तास आधी उठून स्नान वगैरे करून तयार व्हावे. शक्यतो आराध्य देवतेला मनोभावे बंधन करावे. निसर्गाच्या सानिध्यात, मोकळ्या हवेत किंवा एखाद्या बागेत पहाटे सूर्यो ध्यान करणे अतिशय सुखद असते. पहाटे पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिले म्हणजे क्षितिजावर लालसर लाली उमटू लागल्याचे दिसते. या क्षणालाच ब्राह्म मुहूर्त असे म्हणतात. सूर्य हळूहळूवर येऊ लागेल. तो उगवता सूर्य डोळे भरून पहावा. पहाटेचा सूर्य कोवळा असल्यामुळे त्याचा डोळ्यांना त्रास होणार नाही. उगवत्या कोवळ्या सूर्याची सोनेरी किरणे आपल्या संपूर्ण अंगाला सर्वांगावर पडत आहेत, त्याचे तेज शरीराच्या अवतीभोवती पसरत आहे डोळ्यांचे तेज वाढत आहे, मनातला सर्व अंधकार दूर होऊन मन आणि शरीर तेजाने उजळत आहे, अशी कल्पना करावी. सूर्यबिंब जसजसे प्रखर होत जाईल त्यावेळी मात्र ते पाहणे कठीण वाटेल. डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात होईल. अशावेळी डोळ्यांना त्रास न देता ताबडतोब डोळे बंद करावेत आणि दोन्ही डोळ्यांच्यामध्ये मध्यभागी ते सूर्यबिंब डोळे बंद असताना केवळ अनुभवण्याचा प्रयत्न करावा.

सूर्य ध्यान कोणी करू नये-

सूर्यध्यान कोणीही करावे हे जरी खरे असले तरी त्याला काही अपवाद आहेत. काही पथ्य पाळणे नक्कीच आवश्यक ठरते. ज्या व्यक्तींना दुभंग व्यक्तिमत्व (Schizophrenia), तीव्र स्वरूपाचे नैराश्य (Deep Depression), तीव्र उन्माद अवस्था (Mania) अशा प्रकारचे तीव्र स्वरूपाचे मनोविकार असतील तर त्यांनी सूर्य ध्यान करू नये. ध्यान करायची इच्छा असलीच तर मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला आणि परवानगी घ्यावी आणि त्यांच्या देखरेखी खालीच सूर्य ध्यान करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT