biggest full moon 2025 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Supermoon 2025: चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ, दुर्बिणी-टेलीस्कोपचीही गरज नाही; कुठे आणि कसा पाहाल हा 'दुर्मिळ क्षण'?

supermoon 2025 date and time: ५ नोव्हेंबरला दिसणारा हा केवळ सुपरमून नसेल, तर तो या वर्षातील सर्वात जवळचा सुपरमून असणार आहे

Akshata Chhatre

supermoon 2025 visible in India: विचार करा आकाशात दररोज दिसणारा आपला परिचित चंद्र अचानक जर पूर्वीपेक्षा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी दिसला तर तो क्षण किती अविस्मरणीय असेल. लक्षात घ्या ही कोणती जादू नसून, निसर्गाचा एक अद्भुत खेळ आहे, ज्याला आपण 'सुपरमून' म्हणतो. खगोलशास्त्रप्रेमींसाठी नोव्हेंबर महिना एक खास भेट घेऊन आला आहे, कारण ५ नोव्हेंबरला दिसणारा हा केवळ सुपरमून नसेल, तर तो या वर्षातील सर्वात जवळचा सुपरमून असणार आहे.

'सुपरमून' म्हणजे नेमके काय?

चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा पूर्णपणे गोल नसून, अंडाकृती असते. याच कारणामुळे चंद्र कधी पृथ्वीच्या थोडा जवळ येतो, तर कधी दूर जातो. जेव्हा चंद्र त्याच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असताना पूर्णपणे प्रकाशित होतो, तेव्हा त्याला 'सुपरमून' म्हटले जाते. नासाच्या माहितीनुसार, अशा वेळी चंद्र सामान्य दिवसांपेक्षा सुमारे १४ टक्के मोठा आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसतो.

यंदाचा सुपरमून का आहे खास?

या वर्षीचा नोव्हेंबरमधील सुपरमून खास आहे, कारण तो या वर्षातील दुसरा सुपरमून असला तरी सर्वात कमी अंतरावरचा असेल. या दरम्यान, चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर फक्त ३,५७,००० किलोमीटर (सुमारे २,२२,००० मैल) इतके कमी असेल. हे अंतर संपूर्ण वर्षात सर्वात कमी असणार आहे. खगोल वैज्ञानिकांनुसार, हा 'सुपर' चंद्र ५ नोव्हेंबरच्या सायंकाळी आपल्या पूर्ण तेजाने तळपताना दिसेल. जर हवामान स्वच्छ राहिले, तर भारतात हा अद्भुत नजारा संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून रात्रीपर्यंत सहज पाहता येईल.

समुद्राच्या भरती-ओहोटीवर परिणाम

चंद्र जेव्हा पृथ्वीच्या अधिक जवळ येतो, तेव्हा त्याचे गुरुत्वाकर्षण बल किंचित वाढते. यामुळे महासागर आणि समुद्रांमध्ये होणारी भरती-ओहोटी सामान्यपेक्षा थोडी जास्त होऊ शकते. तथापि, वैज्ञानिकांच्या मते हा फरक खूपच किरकोळ असतो आणि सामान्य लोकांना तो जाणवत नाही.

सुपरमून कसा पाहाल?

हा शानदार खगोलीय देखावा पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुर्बिणीची किंवा विशेष उपकरणाची गरज नाही. केवळ आकाश स्वच्छ असणे आवश्यक आहे आणि शक्यतो शहर किंवा रस्त्यावरील कृत्रिम प्रकाश कमी असेल अशा ठिकाणाहून पाहिल्यास चंद्राचे सौंदर्य अधिक तेजस्वीपणे दिसेल.

'बीव्हर मून' हे नाव का?

प्रत्येक पौर्णिमेला एक पारंपरिक नाव दिलेले असते. नोव्हेंबर महिन्यातील पौर्णिमेला 'बीव्हर मून' असे म्हटले जाते. उत्तर अमेरिकेतील एका जुन्या परंपरेशी हे नाव जोडले गेले आहे, जिथे या काळात लोक थंडीपूर्वी 'बीव्हर' नावाच्या प्राण्यांच्या फरसाठी जाळे लावत असत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalasa Banduri: कळसा-भांडुरा प्रकल्प पर्यावरणाला घातक, जंगले होणार उद्ध्वस्त; शास्त्रीय अंगाने पाहण्याची अभ्यासकांची मागणी

Goa ZP Election: गुंता सुटेना! बैठक झाली तरी यादी जाहीर नाही! काँग्रेस हतबल; भाजपचे उर्वरित उमेदवार होणार जाहीर

Horoscope: भाग्य तुमच्या बाजूने! पैशाची वाढ, कामाचे कौतुक, प्रेमसंबंधात आनंद; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण, बदल्यात 5 दहशतवाद्यांची सुटका; 36 वर्षांनंतर 10 लाखांचा इनाम असलेला वॉन्टेड आरोपी CBIच्या अटकेत

Navpancham Rajyog: 2026 मध्ये तीन वेळा 'नवपंचम राजयोग'! 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल; गुंतवणुकीतून मिळणार तगडा फायदा

SCROLL FOR NEXT