हिवाळा आपल्या सर्वांनाच आवडतो कारण तो तीव्र उष्णतेपासून आपला बचाव करते. तसेच, हिवाळा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी एक वाईट ऋतू ठरू शकतो. याकाळात त्वचा कोरडी पडून त्याला खाज सुटते, ओठ फाटतात आणि केस ठिसूळ होतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, आपण आहारात काही बदल करू शकतो. यासाठी अँटिऑक्सिडंट-समृद्ध अन्न खाणे सुरू करू केले तर, त्याचा अधिका फायदा होऊ शकतो.
(Superfoods For Good Skin and Hairs)
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई मुबलक प्रमाणात असतात जे चांगल्या त्वचेसाठी आवश्यक असतात. व्हिटॅमिन सी त्वचेचा तजेलदारपणा वाढवण्यास मदत करते आणि शरीराला कोलेजन तयार करण्यास मदत करते.
काजू
बदामामध्ये व्हिटॅमिन ई जास्त असते आणि ते त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात. अक्रोडमध्ये कोलीन, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड भरपूर असतात आणि त्यात झिंक आणि सेलेनियमही असतात.
गाजर
गाजरांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जो शरीराद्वारे कोलेजन तयार करण्यास मदत करतो. गाजर त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. इतकंच नाही तर गाजरात व्हिटॅमिन ए ही भरपूर असतं. हे सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यास मदत करते.
बीटरूट
दिवसातून एक ग्लास बीटरूटचा रस रक्त शुद्धीकरण आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.
जवस
अंबाडीच्या बियांमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड मुबलक प्रमाणात असते. हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे एक रूप आहे जे चमक मिळविण्यास मदत करते. अंबाडीच्या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि लिग्नॅन्स तुम्हाला तजेलदार त्वचा देतात.
डार्क चॉकलेट
कमीतकमी 70 टक्के कोको पातळी असलेले डार्क चॉकलेट तुमच्या त्वचेसाठी आरोग्यदायी आहे. त्यात फ्लेव्होनॉल असतात जे तुमच्या त्वचेला अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. फ्लेव्होनॉल्स रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात.
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेसाठी चांगले असतात. हे तुमचे रक्त शुद्ध करण्यास मदत करते, तुमची त्वचा निरोगी ठेवते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.