Summer Traveling Plans Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण कडक उन्हामुळे उष्माघाताची किंवा गरमीची समस्या अधिक असते. या ऋतूमध्ये पोट, डोके, शरीर दुखणे अशा अनेक समस्या निर्माण होउ शकतात.
जर तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर काही ट्रॅव्हल टिप्स फॉलो करा. उन्हाळ्यात या टिप्सचा अवलंब केल्यास प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही, तसेच ट्रीप सुद्धा सस्मरणीय राहिल.
हायड्रेटेड रहा
उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होउ शकते. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यावे. याशिवाय लिक्विड ड्रिंक्सचा आहारात समावेश करा. प्रवासा दरम्यान पाण्याची बॉटल सोबत ठेवा
आरामदायी वाटेल असेल कपडे सोबत ठेवावे
उन्हाळ्यात आरामदायक कपडे घालावे. सैल, हलके कपडे घातल्याने शरीराला श्वास घेण्यास मदत होते. फिरताना स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.
औषधे सोबत ठेवा
प्रवासात करतांना औषधांची किट सोबत ठेवावी. या किटमध्ये डोकेदुखी, पोटदुखी, ताप, खोकला, उलट्या यांसारखी सर्व आवश्यक औषधे ठेवावे. तुमच्या हॉटेल जवळील हॉस्पिटलची माहिती घेऊन ठेवा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला अडचण निर्माण होणार नाही.
डासांपासुन बचाव करणारे प्रोडक्ट
उन्हाळ्यात डासांचा त्रास सुरू होतो. या ऋतूत डासांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करा. स्वतःचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण सुती कपडे घाला. कीटक जमतात अशा ठिकाणी जाणे टाळा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.