Summer Smoothie Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Smoothie: उन्हाळ्यात घरीच बनवा 'हे' 5 हेल्दी अन् टेस्टी स्मूदी, राहाल एनर्जेटिक

Puja Bonkile

summer smoothie drinks healthy and tasty recipes to make home

थंडी संपून उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी पाण्यासोबतच थंड आरोग्यदायी पेयांचीही गरज असते. उन्हाळ्याच्या दिवसात सरबत ते लिंबूपाणीपर्यंत सर्व काही प्रत्येक घरात तयार केले जाते आणि घरात येणाऱ्या पाहुण्यांनाही दिले जाते. 

पोषक तत्वांनी युक्त अशी काही आरोग्यदायी पेये आहेत, जी तुम्ही या उन्हाळ्यात सेवन करू शकता. पुढील काही हेल्दी स्मूदीज तुमचे आरोग्य सुधारतील आणि तुम्हाला आतून थंड ठेवतील.

आंबा - केला स्मूदी

उन्हाळ्यात बाजारात आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. आंबा आणि केळी स्मूदी बनवण्यासाठी सर्वात पहिले ते स्वच्छ धुवून त्याचे लहान तुकडे करा. नंतर मिक्सरमध्ये बारिक करा. नंतर दूध मिसळा आणि परत चांगले मिक्स करा.

टरबूज स्मूदी

टरबूज स्मूदी बनवणे अगदी सोपे आहे. टरबूज स्मूदी बनवण्यासाठी टरबूजचे छोटे तुकडे करून दुधात मिक्स करा. जर तुम्हाला दूध वापरायचे नसेल तर नारळाचे पाणी वापरू शकता.

पीच-पपई स्मूदी

पीच आणि पपई स्मूदी बनवण्यासाठी उन्हाळ्यात प्यायल्यास तुम्हाला एनर्जेटिक वाटेल. हे बनवण्यासाठी पीच आणि पपई दह्यामध्ये मिसळा आणि त्याचा आनंद घ्या.

पाइन ऍपल स्मूदी

पाइन ॲपल स्मूदी बनवण्यासाठी पाइन ॲपलचे काही तुकडे घ्या आणि दुधात मिक्स करा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही केळीही घालू शकता. उन्हाळ्यात ही स्मूदी प्यायल्यास फ्रेश वाटेल.

चॉकलेट केळी स्मूदी

मुलांना चॉकलेट आणि केळीपासून बनवलेली स्मूदी खूप आवडेल. हे तयार करण्यासाठी 1-2 पिकलेली केळी घ्या आणि त्यांना चॉकलेटचे तुकडे आणि दूध मिक्स करून मिक्सरमधून बारिक करा. त्यावर बदाम टाकून पिण्याचा आनंद घेऊ शकता. .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT