Summer Child Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Child Tips: उष्णतेच्या झळांत लहान मुलं धोक्यात: 'या' 3 आजारांपासून सांभाळा, जाणून घ्या उपाय

Summer illnesses in children: वाढत्या उष्णतेमध्ये लहान मुलांना अनेक गंभीर आजारांचा धोका असतो. म्हणून लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे लहान मुले गंभीर आजारांना बळी पडू शकतात.

Manish Jadhav

वाढत्या उष्णतेमध्ये लहान मुलांना अनेक गंभीर आजारांचा धोका असतो. म्हणून लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे लहान मुले गंभीर आजारांना बळी पडू शकतात. चला तर मग वाढत्या उष्णतेमुळे होणारे कोणते तीन आजार आहेत आणि त्यांची लक्षणे काय आहेत? तसेच, या आजारांचा लहान मुलावर काय परिणाम होतो? याबाबत जाणून घेऊया...

दरम्यान, वाढत्या उन्हाच्या धगेबरोबर लहान मुलांमध्ये गंभीर आजारांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे ठरत आहे. जर मुलांना हे आजार झाले तर त्याचा त्यांच्या आरोग्यावरच नव्हे तर त्यांच्या शरीराच्या अनेक भागांवरही वाईट परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे हा परिणाम बराच काळ टिकू शकतो. उन्हाळ्यात लहान मुलांना होणारे गंभीर आजार म्हणजे डिहायड्रेशन, उष्माघात आणि अतिसार. लहान मुलांचा या आजारांपासून बचाव केला पाहिजे.

उन्हाळ्यात लहान मुले अतिसाराला बळी पडतात. लहान मुलांमध्ये अतिसाराचा त्यांच्या पचनसंस्थेवर दीर्घकालीन परिणाम होतो. यासोबतच त्यांना डिहायड्रेशनचाही त्रास होतो. डिहायड्रेशनमुळे मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे मुलांची वाढ देखील मंदावते. त्याचा त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. याशिवाय, लहान मुले उष्माघाताला बळी पडू शकतात. शरीराचे तापमान वाढल्यामुळे मुलांना उष्माघाताचा त्रास होतो. यामुळे मुलांचे गंभीर नुकसान होते. म्हणून या तीन गंभीर आजारांपासून मुलांचा बचाव केला पाहिजे.

उन्हाळ्यात मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे. मुलांना जास्त वेळ उन्हात बाहेर जाऊ दिले नाही पाहिजे. यासोबतच त्यांच्या खाण्यापिण्याचीही काळजी घ्यावी. मुलांना सुती, हलके आणि कमी वजनाचे कपडे घालण्यासाठी द्यावेत. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या मुलांना आजारमुक्त ठेवावे. तरीही, जर मुलांना आजार झाला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मडगावात खळबळ! ओल्ड मार्केट सर्कल परिसरात आढळला कुजलेला मृतदेह; ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आव्हान

T20 World Cup 2026: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! टी-20 विश्वचषकात कांगारूंच्या ताफ्यात 'या' वादळाची अचानक एन्ट्री

Goa Drowning Death: गोवा ट्रिप पडली महागात! मोरजी समुद्रात बंगळुरूचे चौघे मित्र बुडाले; तिघांचे प्राण वाचले, एकाचा अंत

Vaibhav Suryavanshi: मैदानावरच्या 'किंग'ची बोर्डाच्या परीक्षेला 'दांडी'! वैभव सूर्यवंशी दहावीची परीक्षा देणार नाही! समोर आलं 'हे' कारण

Video: शंभूशंकर! रशियन पर्यटकांनी गोव्यातील किनाऱ्यावर केली भगवान शंकराची आराधना

SCROLL FOR NEXT