Plan Your Career  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Plan Your Career: करिअरमध्ये यश हवय? मग 'या' टिप्सची घ्या मदत

Puja Bonkile

सर्वजण करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करतात. पण यशस्वी होण्यासाठी करिअरचे नियोजन करणे गरजेचे असते. करिअरचे प्लॅनिंग करणे ही अशी गोष्ट नाही की जी तुम्ही एकदा करता आणि नंतर विसरता. आजच्या काळात, प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना, वेळोवेळी तुम्ही तुमच्या करिअरच्या वाढीकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये वाढ करायची असेल तर नियोजन करणे खूप गरजेचे आहे.

आवड ओळखावी

आपण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवु शकतो. तुम्हाला फक्त तुमची ताकद आणि आवड ओळखण्याची गरज आहे. काम नेहमी असे असले पाहिजे की ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. यामुळे तुम्हाला दररोज प्रेरणा मिळते. करिअरचे नियोजन करणे हे एका दिवसाचे काम नाही. यासाठी आधी तुमची कौशल्ये आणि ताकद ओळखणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

स्पष्ट ध्येय ठेवा

एकदा तुम्हाला तुमची शक्ती आणि कौशल्य समजली की तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करू शकता. करिअर प्लॅनिंग करत असताना टाइमलाइनसह ध्येय निश्चित करावे. तसेच ध्येय पुर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. जेणेकरुन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये वाढ मिळेल. यामुळे तुम्हाला करिएरमध्ये यश मिळवण्यास मदत मिळेल.

जॉब मार्केंटवर रिसर्च

करिअर प्लॅनिंगमध्ये ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तुम्ही जॉब मार्केट आणि इंडस्ट्रीवर संशोधन केले पाहिजे. त्यामुळे भविष्यात तुमची कारकीर्द कशी वळण घेते हे समजून घेणे तुमच्यासाठी सोपे होइल. अनेक वेळा लोक इतरांना पाहून आपले करिअर निवडतात, परंतु भविष्यात त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे करिअरचे नियोजन करताना अशा चुका टाळा.

शिकत रहावे

करिअर प्लॅनिंग करताना आपण सगळेच ठरवतो की येत्या पाच-दहा वर्षात आपलं करिअर कसं असेल. परंतु कोणत्याही अडचणीशिवाय ते साध्य करण्यासाठी योजना करत नाही. आज प्रत्येक उद्योगात झपाट्याने बदल होत असल्याने, तुमच्या करिअरची योजना आखण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी तुम्ही सतत शिकत राहणे आवश्यक आहे. सतत शिकत राहून, तुम्ही केवळ चांगली कामगिरी करत नाही तर तुमच्या करिअरमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वाढवते. यामुळे सतत नव्या गोष्टी शिकण्याची तयारी ठेवावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT