Hair care tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'या' सोप्या टिप्स वापरुन करा केसांना स्ट्रेट

स्ट्रेटनरचा वापर न करता जर तुम्हाला केस स्ट्रेट करायची असेल तर या घरगुती उपायाचा नक्की वापर करा.

दैनिक गोमन्तक

अनेक मुलींना (Girl) प्रत्येक लुकसोबत केस स्ट्रेट ठेवायला आवडतात. यासाठी त्या दररोज स्ट्रेटनरच्या मदतीने केस स्ट्रेट करतात. यामुळे केस खराब होऊ शकतात. जर तुम्हाला केस खराब न होता घरगुती उपाय वापरुन केस स्ट्रेट करायची असतील तर फॉलो करा या सोप्या टिप्स. (Hair Care Tips)

मुलतानी माती:

त्वचेसह केसांसाठीही मुलतानी माती फायदेशीर आहे. ते लावण्यासाठी मुलतानी मातीमध्ये फक्त एका अंड्याचा पांढरा आणि दोन चमचे तांदळाचे पीठ मिक्स करावे. पेस्टमध्ये थोडेसे पाणी घाला जेणेकरून केसांवर स्थिरता राहील. ही पेस्ट केसांना लावून अर्धा तास राहू द्या. 30 मिनिटांनी केसांमध्ये हलक्या हाताने मसाज करावी. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवावे. यामुळे केस स्ट्रेट होण्यास मदत मिळेल.

मध:

एक कप दुधात एक चमचा मध मिक्स करावे. त्यात थोडी स्ट्रॉबेरी घाला आणि ही पेस्ट केसांमध्ये लावा. 2 ते 3 तासानंतर शॅम्पू आणि कंडिशनर वापरून धुवावे. असे 3 ते 4 वेळा केल्यास केस स्ट्रेट राहण्यास मदत मिळेल.

नारळाचे दूध:

एक ग्लास नारळाच्या दुधात लिंबाचा रस मिक्स करावे. ते चांगले मिक्स झाल्यानंतर आणि नंतर 3 तास किंवा त्याहून अधिक काळ फ्रिजरमध्ये ठेवावे. नंतर ही पेस्ट केसांना लावावी. 25 ते 30 मिनिटानंतर शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT